तभा वृत्तसेवा
शेंबाळपिंपरी,
farmer इतर शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे केळीचा बगीचा लावला. आधुनिक पद्धतीने प्रचंड खर्च केला होता. मात्र यावर्षी केळीला कवडीमोल भाव असल्यामुळे अखेर या बागेवर जेसीबी फिरविण्याची वाईट स्थिती ओढवली आहे.
पुसद तालुक्यातील इसापूर (धरण) येथील प्रगतीशिल युवा शेतकरी संदीप विठ्ठल नाईक यांनी शेतात 2 एकर केळी लावली होती. त्यांनी टिशू कल्चरचे उत्कृष्ट बियाणे आणले होते. पूर्णपणे आधुनिक पद्धतीने खताचे तसेच पाण्याचे नियोजन केले. हे सर्व करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जही घेतले होते.farmer मोठी आशा, उत्कंठा बाळगून पोटच्या बाळासारखी केळीची बाग प्रचंड खर्च करूनही भाव नसल्यामुळे शेवटी कंटाळून संदीप नाईक यांनी 20 डिसेंबर रोजी उभ्या केळीवर जेसीबी फिरवली. या प्रसंगामुळे शेतकऱ्यांनी कसे जीवन जगावे व कशा प्रकारची शेती करावी, याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.