अनिल कांबळे
नागपूर,
road accident शहरात वेगवेगळ्या दाेन ठिकाणी घडलेल्या रस्ते अपघातात दाेन जण ठार झाले. पहिल्या घटनेत रुग्णवाहिकेच्या धडकेत एक जण ठार झाला तर दुसऱ्या घटनेत बसचालकाने वृद्ध पादचाऱ्याला चिरडले. या प्रकरणी पाेलिसांनी आराेपी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पहिल्या घटनेत, वेगात जाणाऱ्या अॅम्बुलन्सची धडक बसल्याने रामखिलावन खलगाेनिया (44) रा. डिप्टी सिग्नल यांचा मृत्यू झाला. साेमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी रामखिलावन आणि त्यांचा पुतण्या राजकुमार पाल हे दाेघे दुचाकीने कन्हान रेल्वेस्थानक येथे कामाला जात हाेते. कन्हान पुलावरून जात असताना नागपूरकडे जाणाऱ्या अॅम्बुलन्स मारूती ओम्नीने त्यांना जाेरदार धडक दिली. त्यात दाेघेही जखमी झाले. त्यांना मेयाे रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रामखिलावन यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसèया घटनेत, रस्त्याने पायी जाणाऱ्या नंदू बुधराम धामनिया (62) कापला वस्ती या पादचाऱ्याला बसचालकाने जबर धडक देऊन चिरडले. ही घटना बैद्यनाथ चाैकात घडली. रविवारी दुपारी 3.20 च्या सुमारास मृतक नंदू हे बैद्यनाथ चाैकातून रस्त्याने पायी जात हाेते.road accident त्याचवेळी म. रा. परिवहनच्या (एमएच 14 एम 5635) क्रमांकाचा बसचालक गाेकुल अशाेक ठवरे (32) जांभाेळा, साळखेड (ता. दारव्हा) याने आपली बस वेगात चालवून नंदूला जाेरदार धडक दिली. त्यामुळे नंदू बसखाली सापडून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला मेडिकलमध्ये भरती केले असता उपचारादरम्यान साेमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमामवाडा पाेलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.