अनिल कांबळे
नागपूर,
murdered आईला नेहमी अश्लील शिवीगाळ करणाऱ्या काकाचा पुतण्याने कुऱ्हाडीने वार करुन खून केला. ही धक्कादायक घटना साेमवारी दुपारी तीन वाजता माेहगाव सावंगी येथे घडली. राजू (45) असे मृताचे नाव असून या हत्याकांडील अल्पवयीन पुतण्याला पाेलिसांनी ताब्यात घेतले.

कळमेश्वर तालुक्यातील माेहगाव सावंगी येथे राहणारे शेतकरी कुटुंबियांमध्ये शेतीच्या वाटणीवरुन वाद सुरु हाेता. त्यात राजू हा पुतण्या व भावाला नेहमी शिवीगाळ करीत हाेता. गेल्या काही दिवसांपासून ताे भावाच्या बायकाेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करीत हाेता. आईला वारंवार शिवीगाळ करणाऱ्या काकाशी पुतण्याचा नेहमी वाद हाेत हाेता. मात्र, काका सुधरायला तयार नव्हता. साेमवारी दुपारी राजूने आपल्या वहिणीला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे पुतण्या चिडला. त्याने घरातून कुऱ्हाडआणली आणि थेट काकाच्या मानेवर हल्ला केला.murdered कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात राजूचा जागीच मृत्यू झाला. हत्याकांड घडल्यानंतर पुतण्या थेट कळमेश्वर पाेलिस ठाण्यात पाेहचला. त्याने काकाचा खून केल्याची कबुली दिली. पाेलिसांनी लगेच गुन्हा दाखल करुन आराेपीला ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार मनाेज काळबांडे व कळमेश्वर पाेलिस करीत आहे.