"हा लक्ष्यित हिंसाचार आहे..." बांगलादेशात हिंदूंच्या हत्येबद्दल अमेरिकेचा संताप

23 Dec 2025 18:56:54
वॉशिंग्टन,  
killing-of-hindus-in-bangladesh बांगलादेशात हिंदूंसह इतर धार्मिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हिंसाचारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता अधिक तीव्र झाली आहे. अलीकडेच हिंदू युवक दीपू चंद्र दासची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने बांगलादेशातील कायदा-सुव्यवस्थेची अवस्था आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या घटनेनंतर अमेरिकेतील अनेक लोकप्रतिनिधींनी तीव्र प्रतिक्रिया देत बांगलादेश सरकारकडून ठोस आणि परिणामकारक कारवाईची मागणी केली आहे.
 
killing-of-hindus-in-bangladesh
 
इलिनॉय राज्याचे डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी या घटनेला लक्ष्यित हिंसाचार ठरवत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. देशात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक असून, धार्मिक ओळखीच्या आधारावर नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचे हे गंभीर लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या घटना बांगलादेशातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे स्पष्ट चित्र दाखवतात, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात काही अटक झाली असली तरी केवळ इतक्यावरच थांबणे पुरेसे नसल्याचे कृष्णमूर्ती यांनी स्पष्ट केले. killing-of-hindus-in-bangladesh निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशी झाली पाहिजे, तसेच दोषींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हिंदूंसह सर्व धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, न्यू यॉर्कच्या असेंब्ली सदस्य जेनिफर राजकुमार यांनीही या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. दीपू चंद्र दासची हत्या ही बांगलादेशात अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचारातील सर्वात भीषण उदाहरणांपैकी एक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, जमावाने या तरुणाला अमानुष मारहाण केली, त्यानंतर मृतदेह जाळून महामार्गावर टाकण्यात आला, हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे. killing-of-hindus-in-bangladesh या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देत राजकुमार यांनी या हत्येला धार्मिक छळ आणि नियोजित हिंसाचाराचे स्वरूप असल्याचे म्हटले. ही केवळ एक घटना नसून, देशातील अल्पसंख्याकांसमोरील अधिक गंभीर संकटाचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलच्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी सांगितले की ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत अल्पसंख्याकांविरोधात २,४४२ हिंसक घटना घडल्या असून १५० हून अधिक मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.
या वाढत्या हिंसाचारामुळे बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याचे राजकुमार यांनी सांगितले. killing-of-hindus-in-bangladesh अंतरिम सरकारने कठोर भूमिका घेत दोषींवर कारवाई करावी, अल्पसंख्याकांना निर्भयपणे जगता येईल असे वातावरण निर्माण करावे आणि देशात धार्मिक सलोखा प्रस्थापित करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0