आर्णी नगरपरिषद निवडणुकीत विजयी

23 Dec 2025 11:28:26
तभा वृत्तसेवा
आर्णी,
municipal council elections नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नालंदा किसनराव भरणे सर्वाधिक मते घेऊन नगर परिषद अध्यक्षपदी विजयी झाले. नगरसेवक म्हणून नीता खुशाल ठाकरे, अश्विनी संजय राऊत, मलनस शफी अ. रज्जाक, शाह यास्मिन बानो रहेमान, भावना जयराज मुनेश्वर, सय्यद रियाज वहाब, प्रीती योगेश शिवरामवार, अमोल सुधाकर मांगुळकर हे उमेदवार निवडून आले.
 

आर्णी नगर परिषद  
 
शहरातील गांधीगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नप अध्यक्ष नालंदा भरणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचीत नप अध्यक्ष नालंदा भरणे यांचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात आले.municipal council elections ही विजयी मिरवणूक माहूर चौक, बसस्थानक, शिवनेरी चौक, पाण्याची टाकी या मार्गाने जाऊन कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये आभारसभा घेण्यात आली.
या विजयी मिरवणुकीत माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजी मोघे, माजी आमदार ख्वाजा बेग, माजी नप अध्यक्ष आरीज बेग, रेखा भरणे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, हरीष कुडे, दादाराव भरणे, रवींद्र नालमवार, नरेश राठोड, खुशाल ठाकरे, संजय राऊत, विष्णू इंगोले, दीपक देवतळे, सुनील सुखदेवे, किरण पाटील, जयराज मुनेश्वर, संदेश भगत यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
----
Powered By Sangraha 9.0