वर्धा,
wardha-news : वर्धा नगरात तथागत भगवान बुद्धांच्या करुणामय जीवन, धम्मदृष्टी आणि लोककल्याणकारी उपदेशांना जन-जनापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘बुद्ध चरित्र - भगवंत कथा’ची अमृत वर्षाचे त्रिदिवसीय धम्ममय कार्यक्रम २६, २७ आणि २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भगवान बुद्ध चौक (दत्तपूर चौक), कुमार अप्पा परिसर वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे.
या आयोजनात सुप्रसिद्ध बुद्ध चरित्र भगवंत कथाकार, महापंडित सद्धार्माचार्य भिखु प्रियदर्शी थेरो हे तथागत गौतम बुद्धांच्या जीवन-चरित्र, धम्मोपदेश, संघ-परंपरा आणि निर्वाण मार्गाची अमृतमयी वाणी सादर करतील. त्यांच्या वाणीत करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि शिल यांचा सजीव बोध जनमानसाला आत्मिक शांती आणि नैतिक बल देणार आहे. या महोत्सवात मुख्य अतिथी म्हणून लामा खेनपो कर्मा गेंदून यांची उपस्थिती राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रम अष्टमंगलम फाउंडेशन, वर्धा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय धम्मोत्सवात चार आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, धम्मचक्र प्रवर्तन, संघाची महत्ता, अहिंसा, समता आणि निर्वाण अशा बौद्ध दर्शनाच्या मूल तत्त्वांवर सारगर्भित प्रकाश टाकण्यात येईल.
या तीन दिवसीय कार्यक्रमात सर्व बुद्ध अनुयायी, धम्मप्रेमी, नागरिक, युवक, विद्यार्थी आणि शांतीसाधकांनी सहभागी होण्याचे आवाहन अष्टमंगलम फाउंडेशनचे संयोजक अनिल इंगळे यांनी केले आहे.