ई - क्लास जमिनीवरून विना रॉयल्टी मुरूमाची चोरी !

23 Dec 2025 18:36:19
मानोरा, 
royalty-free-gravel-theft : तालुक्यातील मौजे विठोली शासकीय ई - लास जमिनीमधून विना रॉयल्टी व विना परवानगी अंदाजे १० ते १५ ब्रास मुरूम गजानन दिगाबर धनस्कर यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी शनिवारी व रविवारी रात्री १ वाजतानंतर मुरूम चोरी करून घरात ठेवला आहे. त्यामुळे अवैध मुरुमाचा पंचनामा करून फौजदारी गुन्हे दाखल करून पाचपट रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करावी, असे तक्रार निवेदन तहसीलदार यांना २२ डिसेंबर रोजी विठोली येथील नागरीक गजानन दामोदर पाटील यांनी दिले आहे.
 
 
murum
 
 
 
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे विठोली गावात गजानन दिगाबर धनस्कर यांनी त्यांच्या घराच्या बांधकामा करिता शासकीय ई - लास जमिनीमधून विना रॉयल्टी व विना परवानगी अंदाजे १० ते १५ ब्रास मुरूम चोरी करून आणला आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. राम राम तसेच शासनाचे कडक निर्देश असताना सुद्धा शासनाच्या नियमाची पायमल्ली करून व गुंड प्रवृत्तीने कोणालाही न घाबरता शनिवार व रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशी रात्री १२ वाजतानंतर ई - लास जमिनीमधून चोरीने मुरुम आणला आहे. त्यामुळे दिगाबर धनस्कर यांच्या घरात ठेवलेल्या मुरूमाचा पंचनामा करून कठोर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच मुरूम जप्त करून पाच पट दंड वसूल करून शासन तिजोरीत जमा करण्यात यावा, असे निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
 
 
तक्रारदार गजानन पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार मौजे विठोली येथे ग्राम महसूल अधिकारी यांनी गजानन धनस्कर यांच्या घरकुल योजनेअंतर्गत वापरण्यात आलेल्या गौण खनिज मुरुमाबाबत मोका पाहणी व पंचनामा केला. सदर मोका ठिकाणी १० - ३४ - ३ फूट एकूण १००० रुपये स्केअर फूट बांधकाम केलेल्या जोता बांधकामात वापरलेला मुरूम अवैध असल्याचे दिसून आले. सदर घर मालकाकडे कोणताही परवाना मिळाला नाही, असा अहवाल तहसीलदार यांना दिला आहे.
Powered By Sangraha 9.0