10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला... पुणेकर गारठले!

24 Dec 2025 11:57:03
पुणे,
Pune lowest temperature यंदा डिसेंबर महिन्यात पुण्यात असामान्य थंडी अनुभवायला मिळत आहे. डिसेंबरच्या फक्त २३ दिवसांतच शहरात १३ दिवस किमान तापमान ‘एक अंकी’ नोंदवण्यात आले आहे, जी गेल्या १० वर्षातील सर्वाधिक नोंद आहे. २०१४ पासूनच्या आकडेवारीत यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

 Pune lowest temperature December 
भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप म्हणाले, “सध्या पुणे आणि परिसरातील हवेत आद्रतेचे प्रमाण खूप कमी झाले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे गारवा अधिक जाणवतो. दिवसभर निरभ्र आकाश असल्याने सूर्याची उष्णता रात्री लवकर उत्सर्जित होते, ज्यामुळे पहाटेच्या किमान तापमानात मोठी घट दिसते.”
गेल्या काही वर्षांची Pune lowest temperature तुलना करता, २०१६ मध्ये डिसेंबरमध्ये १२ दिवस किमान तापमान एक अंकी नोंदले गेले होते. २०१८ मध्ये तर नोंदवलेले सर्वात कमी किमान तापमान ५.९ अंश सेल्सिअस होते. मात्र, २०१९ आणि २०२१ मध्ये एकही दिवस एक अंकी तापमानाचे नोंदले गेले नाहीत. यंदा २३ डिसेंबरपर्यंत १३ दिवस एक अंकी तापमानाची नोंद झाली असून, पुढील काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.पुण्यात किमान तापमान ८.१ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहिले. हवामान स्थिर असून दिवसभर निरभ्र आकाश आणि कोरड्या वातावरणामुळे गारवा जाणवत होता. पुढील दोन-तीन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नाही, परंतु गुरुवारपासून (ता. २५) किमान तापमान ११ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस इतके वाढण्याची शक्यता आहे.पुणे आणि परिसरामध्ये बुधवारी (ता. २४) किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाणार आहे. सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे, तर दुपारी आणि सायंकाळी आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
 
 
 
२०१४ – ८, २०१५ – ७, २०१६ – १२, २०१७ – ४, २०१८ – ८, २०१९ – ०, २०२० – ४, २०२१ – ०, २०२२ – २, २०२३ – ०, २०२४ – ५, २३ डिसेंबर २०२५ पर्यंत – १३ (वाढण्याची शक्यता) पुढील काही दिवसांत हवामानातील बदलामुळे पुण्यात थंडीपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, परंतु डिसेंबर महिन्यातील ही गारठी शहरवासीयांसाठी लक्षवेधी ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0