शताब्दी निमित्त विशेष मागणी

24 Dec 2025 12:11:24
नागपूर,
Bharat Ratna Atal Bihari Vajpayee भारत रत्न व माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या २५ डिसेंबर २०२५ रोजी येणाऱ्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांचे स्मरणिक नाणे व छायाचित्र असलेले डाक तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय सर्वे वर्गीय कलार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
 
 
rajesh
 
 
यासंदर्भात अध्यक्ष व माजी उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहर तसेच जागृत सामाजिक कार्यकर्ता भूषण दडवे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी नागपूर डॉ. विपिन इटनकर यांच्यामार्फत २३ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन सादर करण्यात आले. Bharat Ratna Atal Bihari Vajpayee तसेच हे निवेदन गृहमंत्री  अमित शाह, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, दुरसंचार मंत्री  अनुराग ठाकूर, अर्थमंत्री  निर्मला सीतारामन, आरबीआय गव्हर्नर व पोस्ट विभागाचे महासंचालक यांनाही पाठविण्यात आले आहे.गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असून आता या मागणीवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
सौजन्य:राजेश हरडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0