८४ दिवसांत २२ हजार किमी भारत परिक्रमा !

24 Dec 2025 17:50:19
 नागपूर,
Dr. Anshuza Kimmatkar, Lakshmi Mathare रामटेक येथील डॉ. अंशुजा किम्मतकर व लक्ष्मी माथरे यांनी स्वतः कार चालवत ८४ दिवसांत तब्बल २२ हजार किलोमीटरची भारत परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली. कोणताही अतिरिक्त चालक न घेता केलेल्या या प्रवासात त्यांनी लडाखमधील खारदुंगला, झोजिला, ईशान्य भारतातील दुर्गम भाग तसेच दक्षिणेतील धनुष्कोडीपर्यंतचा प्रवास जिद्द व धैर्याने पार केला.
 
 
sarang
 
 
१ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर झिरो माईल येथून सुरू झालेल्या या मोहिमेचा समारोप २३ डिसेंबर २०२५ रोजी झाला. “भारत के रंग, नारी के संग” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या मोहिमेद्वारे महिला सशक्तीकरण, मासिक पाळी आरोग्य शिक्षण व स्तन कर्करोग जनजागृतीचा संदेश देण्यात आला. Dr. Anshuza Kimmatkar, Lakshmi Mathare या पराक्रमामुळे रामटेकचा नावलौकिक वाढला असून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे.
सौजन्य:सारंग पांडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0