मुंबई,
eknath shinde आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) मुंबईसह एकूण ९ पालिकांमध्ये युती केली आहे. या युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलत असून, दोन्ही गटांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वादही घेतला आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदेंनी ठाकरे बंधूंची ही युती फक्त स्वार्थासाठी केली गेल्याचा आरोप केला. “ठाकरे बंधूंचा अजेंडा कुठे आहे? एक तरी शब्द विकासावर बोलले का? जे आपली पोरं सांभाळू शकत नाही, ते मुंबई काय सांभाळणार?” असे प्रश्न ते म्हणाले. शिंदेंनी मराठी माणसाच्या हक्कांविषयी देखील निशाणा साधला आणि म्हटले, “मराठी माणूस जेव्हा मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याचं खच्चीकरण झालं, तेव्हा त्यांना मराठी माणसाची आठवण का आली नाही?”
उपमुख्यमंत्री शिंदेंनी eknath shinde युतीच्या धोरणात्मक बाजूवर देखील प्रश्न उपस्थित केला. “जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लावतात की मुंबई महाराष्ट्रापासून आणि मराठी माणूस मुंबईपासून वेगळा करणार? त्यांनी मराठी माणसाला घर दिलं का? गिरणी कामगारांना घरं दिली का?” असे ते म्हणाले आणि आपल्या सरकारने साडेबारापैकी हजार लोकांना घरं दिली असल्याचा आणि १ लाख गिरणी कामगारांना घरं देण्याची योजना राबविली असल्याची माहिती दिली.शिंदेंनी मुंबईतील विकासकामांचा उल्लेख करत सांगितले, “महालक्ष्मी रेसकोर्समध्ये १२५ एकर जागा आणि कोस्टल रोडच्या १७० एकर जागा घेण्याची हिम्मत आमच्या सरकारने दाखवली. ३०० एकर जागेवर मुंबईमध्ये जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क बनवले जात आहे. हे सर्व मुंबईकरांसाठी आमच्या सरकारकडून केले जात आहे. हठाकरे बंधू जे काही एकत्र आले आहेत ते फक्त स्वार्थासाठी आहे.”शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या राज ठाकरेंबाबतच्या पूर्वीच्या वक्तव्यांचा उल्लेख करत, युतीला “स्वार्थाची” ठरवले आणि म्हटले, “उद्धव ठाकरे हे पूर्वी राज ठाकरेंबाबत काय काय बोलले, ते पाहिलं पाहिजे. ही युती तत्वासाठी नाही तर खुर्ची, सत्ता आणि मतांसाठी केलेली आहे. स्वार्थ संपला की युती संपली, अशी ही युती आहे.”
राजकीय विश्लेषकांच्या मते, ठाकरे बंधुंच्या युतीमुळे मुंबई महापालिकेतील निवडणूक अधिकच गतीशील व संघर्षपूर्ण होणार आहे, तर शिंदेंच्या आरोपांनी युतीला सुरुवातीपासूनच आव्हानात्मक स्वरूप दिले आहे.