मुंबई,
Ishaan Roshan Aishwarya Singh wedding controversy बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन यांचा चुलत भाऊ आणि प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांचा मुलगा ईशान रोशन याचा विवाह सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी ईशान रोशनने त्याची दीर्घकाळची मैत्रीण ऐश्वर्या सिंह हिच्याशी विवाह केला. हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपात पार पडला असून, कुटुंबीय आणि मोजके जवळचे मित्र यांच्याच उपस्थितीत लग्न पार पडले. मात्र, मर्यादित पाहुण्यांनंतरही या हाय-प्रोफाइल लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे.
लग्नानंतर रोशन कुटुंबीयांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. कुटुंबातील आनंद, नृत्य आणि उत्साह या साऱ्याचे दर्शन या व्हिडिओंमधून होत आहे. दरम्यान, याच लग्नाशी संबंधित एक वेगळा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये दिग्गज चित्रपट निर्माते आणि ऋतिक रोशन यांचे वडील राकेश रोशन हे किन्नर समुदायातील व्यक्तींशी शगुनाच्या मुद्द्यावर चर्चा करताना दिसत आहेत.
सामान्य भारतीय लग्नांप्रमाणेच ईशान आणि ऐश्वर्या यांच्या लग्नातही किन्नर बधाई घेण्यासाठी आले होते. त्यांनी नववधू ऐश्वर्या यांची नजर उतरवून तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर शगुनाबाबत बोलणी सुरू झाली. मात्र, दोन्ही बाजूंमध्ये रकमेवरून एकमत न झाल्याचे दिसून आले. या दरम्यान किन्नरांनी ऐश्वर्याला काही काळ तिथेच थांबवले, त्यामुळे परिस्थिती थोडी तणावपूर्ण बनली. अखेर या प्रकरणात राकेश रोशन यांनी स्वतः हस्तक्षेप केला.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राकेश रोशन किन्नरांसोबत उभे राहून शगुनाबाबत चर्चा करत असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यांच्या सोबत राजेश रोशन आणि नवविवाहित ईशान रोशनही उपस्थित आहेत. किन्नरांच्या हावभावांवरून शगुनाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंची सहमती होत नसल्याचे जाणवत आहे. बराच वेळ चर्चा होऊनही तोडगा न निघाल्याचे चित्र दिसते. दरम्यान, फोटोग्राफरांनी राकेश रोशन यांना छायाचित्रांसाठी बोलावल्याने त्यांनी चर्चा तिथेच थांबवून फोटोसेशनसाठी वेळ दिला.दरम्यान, या सगळ्या प्रकारांपासून दूर रोशन कुटुंबीयांनी लग्नाचा आनंद मनसोक्त लुटल्याचे दिसून आले. लग्नाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ऋतिक रोशन यांची गर्लफ्रेंड सबा आझाद त्यांच्या सोबत उपस्थित होती. तसेच ऋतिक यांची माजी पत्नी सुझैन खान हिनेही या विवाहाला हजेरी लावली होती. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड अरसलान गोनीही दिसून आला. ऋतिकचे दोन्ही मुलगे रेहान आणि हृदान यांनीही या लग्नसमारंभात सहभागी होत कुटुंबासोबत आनंद साजरा केला.एकीकडे ईशान आणि ऐश्वर्या यांच्या लग्नातील आनंदी क्षण चर्चेत असताना, दुसरीकडे किन्नर आणि राकेश रोशन यांच्यात शगुनावरून झालेल्या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.