काश्मीरच्या पाच जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा!

24 Dec 2025 10:55:31

jammu
 
 
श्रीनगर,
Kashmir avalanche warning हवामान खात्याने जम्मू आणि काश्मीरच्या पाच जिल्ह्यांसाठी हिमस्खलनाचा इशारा जारी केला आहे. डोडा, गंदरबल, किश्तवार, पूंछ आणि रामबन या जिल्ह्यांमध्ये अलिकडे झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे पुढील २४ तासात २,८०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमस्खलनाची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामान खात्याने नागरिकांना हिमस्खलनाचा धोका असलेल्या भागातून दूर राहण्याचे आणि अधिकृत सल्ल्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. उंच शिखरांवर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाल्यानंतर तीव्र दाबाखाली बर्फ घसरल्यास हिमस्खलन घडते, जे आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही वस्तूला वाहून नेतात. त्यामुळे पर्वतारोहण खूप धोकादायक ठरते. श्रीनगर हवामान केंद्रानुसार, २८ डिसेंबरपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर २९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान अनेक भागात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पर्वत भागात प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0