आता सीआरपीएफ छावणीत बिबट्याचा शिरकाव; जवान जखमी

24 Dec 2025 14:10:30
जम्मू,
Leopard in CRPF camp जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कापरान भागात एका बिबट्याने भयानक हल्ला केला असून, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीत शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. आज सकाळी या बिबट्याने जंगलातून बाहेर येत गावाच्या दिशेने निघाला. दरम्यान ग्रामस्थांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने तो भिंतीवरून उडी मारत सीआरपीएफच्या छावणीत शिरला आणि सैनिकावर हल्ला केला.
 
 
 
 
crpf
घटनेनंतर वन्यजीव विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बिबट्याला पकडण्यासाठी करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. गेल्या काही काळापासून परिसरात काळे अस्वल आणि बिबटे अन्नाच्या शोधात निवासी भागात फिरत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे मानवी आणि प्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जखमी झालेला जवान मेसमध्ये नाश्ता करत होता.जखमी जवानाला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले असून, त्यावर उपचार सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0