लंडन,
muslim-in-london भारतामध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढत असल्याचा दावा अनेकदा केला जातो, मात्र ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये मुस्लीमांची संख्या वाढत आहे आणि यामुळे बहुसांस्कृतिक बदल पाहायला मिळत आहेत. युकेमध्येही मुस्लीमांची वाढ लक्षात येत आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये, विशेषतः लंडनमध्ये, मुस्लीम लोकसंख्या वाढत असून तिथल्या रस्त्यांवर, मॉल्समध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी हिजाब किंवा बुरख्यातील महिलांची उपस्थिती स्पष्ट दिसून येत आहे. काही पर्यटकांनी तिथली परिस्थिती पाहून लंडन पाकिस्तानसारखा वाटत असल्याचा अनुभव शेअर केला आहे.

लंडनमध्ये मुस्लीमांची संख्या सुमारे १५ टक्के आहे, जी सर्वाधिक आहे. मुस्लीम काऊन्सिल ऑफ ब्रिटनच्या २०२५ च्या अहवालानुसार २०११ ते २०२१ दरम्यान मुस्लीम लोकसंख्या १.२ दशलक्ष ने वाढली, जी युकेच्या एकूण वाढीच्या ३२ टक्के आहे. अंदाजानुसार २१०० पर्यंत मुस्लीम लोकसंख्या २० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, तरीही बहुसंख्यांक होण्यासाठी आणखी अनेक वर्षे लागतील. लंडनमध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढण्यामागचे मुख्य कारण उच्च जन्मदर, इमिग्रेशन आणि कन्व्हर्जन आहेत. उच्च जन्मदरात मुस्लीम महिला सरासरी २.९ मुले जन्म देतात, तर एकूण लोकसंख्येचा सरासरी जन्मदर १.८ आहे. भारतामध्ये मुस्लीमांची लोकसंख्या सुमारे १४ टक्के आहे, म्हणजे सुमारे १७ कोटी लोक. muslim-in-london१९५१ पासून ही संख्या ९.८ टक्क्यांनी वाढली आहे, मात्र ग्रोथ रेट सलग कमी होत आहे. १९९१ ते २००१ दरम्यान वाढीचा दर २९ टक्के होता तर २०११ मध्ये तो २४ टक्के झाला. भारतातील मुस्लीम वाढ मुख्यतः नैसर्गिक आहे; अधिकृत इमिग्रेशनचा भाग कमी आहे. सरकारकडून दिलेल्या आकडेवारीनुसार अतिरंजित दावे बेताचे आहेत, आणि CAA-NRC सारखे कायदे या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आले आहेत.
युकेमध्ये मुस्लीम समाज अर्थव्यवस्थेत सक्रिय योगदान देत आहे, परंतु काही भागांमध्ये सेग्रीगेशन आढळते. muslim-in-london लंडन अजूनही मिनी पाकिस्तान बनलेला नाही, परंतु हे शहर बहुसांस्कृतिकतेचा समृद्ध अनुभव देणारे ठिकाण बनले आहे. मुस्लीम लोकसंख्येची वाढ नैसर्गिक आहे, आणि एकत्रित समाजात इंटीग्रेशन हा मुख्य आव्हान आहे.