आमदार प्रवीण दटके यांना ओबीसी आघाडीचे निवेदन

24 Dec 2025 17:35:35
नागपूर,
OBC Front Central Nagpur भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडी, मध्य नागपूर इतवारी मंडळाच्या अध्यक्षा कल्पना मानापुरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांची नवनियुक्त ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान आरक्षणाच्या तरतुदीनुसार प्रभाग क्रमांक २० मध्ये शुद्ध ओबीसी समाजातील उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आमदार प्रवीण दटके यांना सादर करण्यात आले. यावेळी आमदार दटके यांनी ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, असा विश्वास उपस्थितांना दिला.
 
 
 
mana
 
या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी मोरेश्वर वानखेडे, अनिल सुने, बादल राऊत, शेखर कडवे, प्रमोद बेले, राजू कनोजिया, कृष्णा उमाठे, स्वप्नील बेलखोडे, राहुल गायधने, विजय खंडे, मीना सहारे, OBC Front Central Nagpur कल्याणी कुबडे, ऊषा बेले, शुभांगी दातीर, लता वानखेडे, प्रीती गायधने, प्रतिभा सावरकर, सारिका खंडे, रूपाली नाकोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य: कल्पना मानापुरे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0