वडील मजूर... स्वयंपाकी आई… बाराबंकीच्या पूजा पालला पंतप्रधान 'बाल पुरस्कार'

24 Dec 2025 16:36:44
उत्तर प्रदेश,
Pooja Pal उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील अगेहरा या छोट्या गावातील बाल वैज्ञानिक पूजा पाल हिची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून विकसित केलेल्या धूलमुक्त थ्रेसरच्या अभिनव मॉडेलसाठी पूजा पालला प्रधानमंत्री बाल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रातील हा प्रतिष्ठित पुरस्कार 26 डिसेंबर रोजी प्रदान केला जाणार असून, या घोषणेनंतर पूजा पालच्या कुटुंबासह संपूर्ण गावात आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
 

Pooja Pal, 
केवळ आठवीत शिक्षण घेत असलेली पूजा पाल हिने आपल्या कल्पकतेने शेतकऱ्यांसमोरील एक गंभीर समस्या ओळखली. फसल मळणीदरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनासंबंधी आजारांचा धोका वाढतो, हे लक्षात घेऊन तिने धूळ नियंत्रित करणारा थ्रेसरचा नमुना तयार केला. या मॉडेलमुळे मळणीच्या वेळी होणारी धूळ मोठ्या प्रमाणात कमी होते आणि शेतकऱ्यांना आरोग्यदृष्ट्या दिलासा मिळतो.पूजाने सातवीत असतानाच राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये आपला प्रकल्प सादर केला होता. तिच्या संशोधनाची दखल केंद्र सरकार तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने घेतली असून, या नवकल्पनेला उपयुक्त आणि प्रभावी मानले आहे. याच कामगिरीच्या जोरावर पूजाला जपानसह आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली आहे.
 
 
जिल्हाधिकारी Pooja Pal शशांक त्रिपाठी यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर सिरौलीगौसपुर तहसीलमधील अगेहरा गावातील पूजा पालला हा सन्मान दिला जाणार आहे. यापूर्वीही राज्य सरकारकडून पूजाला बाल वैज्ञानिक म्हणून एक लाख रुपयांची सन्मानरक्कम प्रदान करण्यात आली आहे.पूजाचे वडील पुत्ती लाल हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई सुनीला देवी सरकारी शाळेत स्वयंपाकीण आहे . तीन बहिणी आणि दोन भावंडांसह कुटुंब मर्यादित साधनसंपत्तीमध्ये राहते. दीर्घकाळ छप्पराच्या घरात वास्तव्य केल्यानंतर आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कुटुंबाला पक्के घर मंजूर झाले आहे.
 
 
प्रशासनाने पूजा Pooja Pal   पालला जिल्ह्यात ‘मिशन शक्ती’ अंतर्गत रोल मॉडेल म्हणूनही घोषित केले आहे. “मेहनत, चिकाटी आणि योग्य दिशेने विचार केला तर कोणतेही ध्येय साध्य करता येते,” असे पूजा सांगते. तिची ही यशोगाथा केवळ बाराबंकी किंवा उत्तर प्रदेशपुरती मर्यादित न राहता, देशभरातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असून, प्रतिभेला साधनांची मर्यादा नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Powered By Sangraha 9.0