'डेट' करण्यासाठी ३१ हजार रुपये... लग्नासाठी २५ लाख

24 Dec 2025 14:58:23
कोरिया,
South Korea marriage subsidy आजच्या धावपळीच्या युगात तरुणांना करिअर आणि कामाच्या ओढीत वैयक्तिक आयुष्याला वेळ देणे खूपच कठीण झाले आहे. पण दक्षिण कोरिया सरकारने यावर एक अनोखी आणि आश्चर्यकारक उपाययोजना राबवली आहे. या देशात सरकार तरुण जोडप्यांना डेटिंगसाठी पैसे देत आहे आणि जर डेटिंग लग्नात रूपांतरित झाले, तर त्यांना २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक बक्षीस मिळते.
 
 

South Korea marriage subsidy  
दक्षिण कोरियातील तरुण अनेकदा कामात इतके व्यग्र आहेत की त्यांना वैयक्तिक आयुष्यासाठी वेळच मिळत नाही. वाढती महागाई आणि घरांच्या किंमतींमुळे तरुण लग्न आणि मुलं जन्माला घालण्यापासून दूर पळत आहेत. याचा थेट परिणाम म्हणून देशाचा जन्मदर ऐतिहासिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे. सरकारची योजना तरुणांना जोडण्यावर आणि लग्नासाठी प्रोत्साहित करण्यावर केंद्रित आहे. डेटिंगसाठी जोडप्यांना $350 (सुमारे ३१,००० रुपये) खर्चाच्या मदतीत दिले जाते. हा आर्थिक आधार जोडप्यांना एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी आणि नाते घट्ट करण्यासाठी दिला जातो. तसेच, जर जोडपे लग्न करण्याचा निर्णय घेतात, तर त्यांना २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे ते आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात आर्थिक अडचणीशिवाय करू शकतील.
 
 
दक्षिण कोरिया South Korea marriage subsidy  आणि चीनसारख्या देशांमध्ये लोकसंख्येचे संकट वाढत असून, फक्त आर्थिक मदतीनेच लोकसंख्या वाढणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. तरुणांवर कामाचा प्रचंड दबाव असल्याने कुटुंब वाढवणे ही त्यांच्यासाठी कधीकधी ओझे वाटू लागते. दक्षिण कोरियामध्ये मुल जन्मल्यावरही मोठा आर्थिक भत्ता दिला जातो, तरीही देशाचा जन्मदर अपेक्षेइतका वाढत नाही.विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, भविष्यात लोकसंख्येचा हा प्रकारचा दबाव केवळ या दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनू शकतो. त्यामुळे या उपाययोजनांचा परिणाम आणि त्यांच्या यशाचा अभ्यास जागतिक स्तरावर महत्त्वाचा ठरेल.
Powered By Sangraha 9.0