बालजगत संस्थापिका सुमतीताई सुकळीकर यांना अभिवादन

24 Dec 2025 12:41:44
नागपूर
Sumatitai Sukalikar दीनदयाल शोध संस्थान, बालजगत येथे आज बालजगतच्या संस्थापिका व समाजकार्याच्या क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व सुमतीताई सुकळीकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या कार्याला उजाळा देत आदरांजली अर्पण करण्यात आली.
 
jagat
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे यांनी ताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बालजगतसारख्या बालकांसाठी समर्पित संस्थेची उभारणी करून समाजात संवेदनशीलतेची नवी जाणीव निर्माण करण्याचे कार्य सुमतीताई सुकळीकर यांनी केले,Sumatitai Sukalikar असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.यावेळी बालजगतच्या उपनिदेशिका माधवी जोशीराव, प्रशांत अत्रे तसेच बालजगतचे कार्यकर्ते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सुमतीताईंच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
सौजन्य : सायली जतकर ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0