वर्धा,
wardha-farmers-suicide जिल्ह्यात विविध कारणाने शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याची योग्य अंमलबजावणी करा. शेतकर्यांच्या जनावरांना मोफत चारा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, वन व ग्रामविकास विभागाने एकत्रित प्रयत्न करावे, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी केल्या.

wardha-farmers-suicide जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकर्यांना मोफत चारा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुत डॉ. जगदीश बुकतरे, आदी उपस्थित होते. शेतकर्यांना शेतीशिवाय आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नाही. शेतीला जोडधंदा सुरू करण्याकरिता त्यांचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी मोफत चारा उपलब्ध करून दिल्यास दुग्ध उत्पादन वाढून आर्थिक मदत होईल. यासाठी कृषी विभागाने गायरान जमिनीवर चारा लागवड करावी.
wardha-farmers-suicide सेलू तालुयातील इटकी, महाकाळ, पिंपळखुटा येथे चारा लागवडीकरिता जागा निश्चित करण्यात आली असून तत्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाला दिल्या. कारंजा तालुक्यातील काही गावातील पशुपालक शेतकर्यांचे चार्याअभावी चार महिने स्थलांतर होत असतात. यावर उपाय म्हणून पाण्याचे स्त्रोत असलेल्या तलावाच्या जवळ चारा उत्पादन करावे. सोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील सदस्यांना एमगीरीमार्फत शेतकर्यांसाठी राबविण्यात येत असलेले प्रशिक्षण कृषी विभागाच्या वतीने मोफत उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
एमगीरीला दिली भेट wardha-farmers-suicide
अॅड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी एमगीरी येथे भेट देऊन संस्थेच्या विभागामार्फत शेती व अन्य उत्पादनाचे संशोधन करुन तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार्या कामाची तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण राबविण्यात येत असलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. संत्रावर संशोधन करून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेल्या प्रक्रियेचे शासनाच्या योजनेमार्फत शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच संस्थेमार्फत गाईच्या शेणापासून तयार करण्यात येणार्या कागद, मूर्ती व विविध वस्तूचे सुद्धा शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. आशुतोष मुरकुटे यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणारे संशोधन व प्रशिक्षणाची माहिती दिली.