नवीन वर्षाच्या तिसऱ्या आठवड्यात ३ राशींचे नशीब उजळणार

24 Dec 2025 16:37:57
Zodiac signs luck in the new year नवीन वर्षाच्या तिसऱ्या आठवड्यात बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाला बुद्धिमत्ता, विचारशक्ती, संवाद, व्यवसाय आणि निर्णयक्षमता यांचा कारक ग्रह मानले जाते. १७ जानेवारी २०२६ रोजी बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार असून, या ग्रहस्थितीचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे मकर राशीत आधीच सूर्य, मंगळ आणि शुक्र ग्रह उपस्थित असल्याने या संयोगामुळे काही राशींसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधाच्या संक्रमणाचा थेट प्रभाव माणसाच्या विचारपद्धतीवर, बोलण्याच्या शैलीवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर पडतो. मकर राशीतील बुध व्यावहारिकता, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ देणारा मानला जातो. या काळात घेतलेले निर्णय आणि केलेले कष्ट दीर्घकाळ लाभदायक ठरू शकतात, असे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.
 
 new year budha 
 
 
या संक्रमणाचा लाभ घेणाऱ्या राशींमध्ये मेष राशीचा प्रामुख्याने समावेश आहे. मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता असून, कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग दिसून येत असून, आर्थिक स्थितीही मजबूत होण्याची चिन्हे आहेत.
सिंह राशीच्या लोकांसाठीही बुधाचे हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. नोकरीत प्रगतीची दारे उघडू शकतात आणि अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामातील यशामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. एकूणच हा काळ सिंह राशींसाठी समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा प्रवेश विशेष फलदायी मानला जात आहे. नशिबाची साथ मिळाल्याने अनेक कामे सहज पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत असून, सामाजिक मान-सन्मान वाढू शकतो. अध्यात्माकडे कल वाढण्याचीही शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील, ज्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील.
 
 
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी. 
Powered By Sangraha 9.0