२७५० विद्यार्थ्यांनी एकाचवेळी दिली परीक्षा

25 Dec 2025 17:39:34
आर्वी,
Vachate Vha’ program, भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्था, आर्वीच्या द्वारा प्रेरित स्व. दिलीपराव उपाख्य भय्यासाहेब काळे स्मृती मंचच्या वतीने ‘वाचते व्हा’ या उपक्रमांतर्गत वाचन चळवळीचा उद्घाटन सोहळा व लेखी परीक्षा सन २०२५-२६ चे वाचनीय साहित्यिक श्रीमती सुधा मूर्ती यांच्या पुण्यभूमी भारत, गोष्टी माणसांच्या, आजीच्या पोथडीतील गोष्टी या पुस्तकावर आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत २७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एकाचवेळी परीक्षा दिली.
 
 
 Arvi reading initiative, ‘Vachate Vha’ program,
या उपक्रमाचे उद्घाटन भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. शोभा काळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध वते, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. हेमंत खडके, प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार प्रशांत देशमुख, निर्मला हिवसे, प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटके उपस्थित होते.
यावेळी डॉ. हेमंत खडके यांनी आजच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त केल्याबद्दल संस्थेचे आभार मानून या उपक्रमाची स्तुती केली. सोबतच विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या कविता सादर करून विद्यार्थ्यांना सुधा मूर्ती यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. अ‍ॅड. शोभा काळे यांनी अ‍ॅड. स्व. भय्यासाहेब काळे यांच्या व्यासंगी वाचनाबद्दल विवेचन करून त्यांच्या पुस्तकाच्या आवडीबद्दल सांगितले. विविध विषयांचे पुस्तके वाचून त्यावर चर्चा करायला अ‍ॅड. भय्यासाहेबांना आवडत होते. सोबतच आजच्या विद्यार्थ्यांना त्यातून कशाप्रकारे प्रेरणा घ्यायला पाहिजे हे सांगितले. प्रशांत देशमुख यांनी विविध पुस्तकाच्या वाचनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन देशहितासाठी कार्य करायला पाहिजे, असे सांगितले.
दरम्यान, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी, कृषक कन्या विद्यालय आर्वी व कृषक मराठी शाळा या परीक्षा केंद्रावर १९६२ विद्यार्थी, तर मॉडेल हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, कारंजा (घा.) येथे ७८९ असे २७५० विद्यार्थी परीक्षेसाठी हजर होते. परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना साहित्यिक सुधा मूर्ती यांच्या पुण्यभूमी भारत, गोष्टी माणसांच्या, आजीच्या पोथडीतील गोष्टी ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातून विद्यार्थ्यांचे ज्ञानवृद्धींगत व्हावे व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, हा उद्देश या उपक्रमाचा होता.
संचालन प्रा. दर्शनकुमार चांभारे, प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटके यांनी तर आभार डॉ. मनीषा खाकरे यांनी मानले. याप्रसंगी संस्थेअतंर्गत येणार्‍या सर्व शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0