समुद्रपूर,
Nayna Tulaskar मी समुद्रपूर शहरातील विद्या विकास महाविद्यालयात दोन वर्ष प्राध्यापक म्हणून काम करतेवेळी या शहराशी माझं नातं जुळलं आणि मी येथे रुजून गेले. या काळात मी येथील महिला व विद्यार्थ्यांना घेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबवले. माझे स्वप्न समुद्रपूर शहरासाठी खूप मोठे होते आणि आहे. लग्नानंतर याच ठिकाणी उपप्राचार्य म्हणून काम केले. आता संस्था सचिवाचा कारभार सांभाळत आहे. सुरूवातीपासूनच शिक्षण क्षेत्रात आवड आहे, मात्र राजकीय क्षेत्राचा कोणताही रस नसताना भाजपाने मला हिंगणघाट येथील नपच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. हिंगणघाटच्या जनतेनेही माझ्यावर मोठा विश्वास टाकून नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. लोकाभिमुख प्रशासनासह शहराच्या विकासासाठी अनेक संकल्पना मनात असून त्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करणार, असे मत हिंगणघाटच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी व्यत केले.
समुद्रपूर येथील भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली असता आयोजित सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपाचे विधानसभा प्रमुख वामन चंदनखेडे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उमेश तुळसकर, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, मंडल अध्यक्ष हेमंत राऊत, शेषराव तुळणकर, प्रा. मेघश्याम ढाकरे आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. नयना तुळसकर Nayna Tulaskar पुढे म्हणाल्या की, हिंगणघाट माझे सासर असलं तरी माझ्यासाठी समुद्रपूर शहर माहेरपेक्षा कमी नाही. त्यामुळे हिंगणघाटसह समुद्रपूर शहरासाठी मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करून हे शहर सुद्धा सुंदर करता येईल, यासाठी नकी प्रयत्न करेल, असेही त्या म्हणाल्या. या सत्कार समारंभाला जिपचे माजी सदस्य रोशन चौके, पंसचे माजी सदस्य सुनील डुकरे, वसंत घुमडे, पंसचे माजी उपसभापती रवींद्र दांडेकर, रामकृष्ण इंगोले, सरपंच राजू नौकरकर, सरपंच विलास नवघरे, माजी सरपंच मुर्लीधर चौधरी, उत्तम घुमडे, राहुल गाढवे, प्रभाकर घुमडे, अरुण मोटघरे, विनोद कन्हाळकर, रजत भुरे, विकी बारेकर, प्रसाद पंत, विठ्ठल झाडे, गजानन मुंगसे, नाना फलके, बंडू डंबारे, आशिष परमोरे, आशिष देशमुख, आदींची उपस्थिती होती.