नागपूर-अजनीत 60 टक्के विकास कामे पूर्ण

25 Dec 2025 11:46:44
नागपूर,
development work सुरक्षेेला प्राधान्य देत नागपूर व अजनी रेल्वे स्थानकात विकास कामे सुरू असून ती 60 टक्के झाली आहेत. वर्षभरात ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. नव्या गाड्याही सुरू केल्या जातील, मात्र ही विकास कामे पूर्ण झाल्यानंतरच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

ajani 
 
विवेककुमार गुप्ता यांनी प्रारंभी सांगितले की, आज दिवसभर आमला ते नागपूर सुरक्षा तपासणी केली. पांढुर्णा, मुलताई, गोधनी आदी रेल्वे स्थानकांची पाहणी केली. अधिकाèयांकडून माहिती जाणून घेतली. वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, नागपूर व अजनी रेल्वे स्थानकावर विकास कामे सुरू आहेत. संत्रा मार्केटकडील इमारत पूर्ण होत आली आहे. पश्चिमेकडीलही इमारत पूर्ण होईल. फलांटाचे फाऊंडेशन मजबुत केले जात आहे. फलाट 1 व 2चे नंतर केले जाणार आहे. 60 टक्के काम झाले आहे. वर्षभरात मोठी प्रगती दिसेल. अजनी तेथे तीन फलाट आहेत. आणखी 4 फलाट तयार केले जात आहेत. इतरही कामे आहेत. हे फलाट 4 महिन्यात पूर्ण करून तेथून काही गाड्या सोडल्या जातील. गोधनी येथेही काम सुुरू आहे. वर्धा-बल्लारशा तिसरा मार्ग टाकला जात आहे. नागपूर व पुणे दरम्यान आणखी गाड्या सुरू करण्याचा विचार असला तरी सर्वत्र विकास कामे सुरक्षेला प्राधान्य देऊनच केली जात आहेत.development work ही कामे पूर्ण झाल्यानंतर क्षमता नक्कीच वाढणार आहे. सर्वाधिक वंदेभारत (4) नागपुरातून सुटतात. नागपूर देशाच्या मध्यभागी असल्याने अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानक आहे. भविष्यात आणखी गाड्या सुरू होणार आहेत. नागपूरहून थेट प्रयागराज, अयोध्या वा उत्तर भारतासाठी गाडी सुरू केली जाईल. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला, नागपूर मंडळ व्यवस्थापक विनायक गर्ग व इतर अधिकारी उपस्थित होते.
 
कुंभ मेळा
कुंभ मेळा लक्षात घेता रेल्वेने 15 कोटींचा निधी दिला आहे. त्यातून नाशिक व परिसरातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे. पूल, फलाट वगैरे विविध मूलभूत रचना, प्रवासी सोयी केल्या जात आहेत. देशाच्या चारही दिशांनी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार असल्याचे विवेककुमार गुप्ता यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0