राष्ट्रनिष्ठा जपणारे अटलबिहारी वाजपेयी प्रेरणादायी व्यक्तीमत्व

25 Dec 2025 16:19:34
नागपूर,
Nitin Gadkari माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन नैतिकता, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे प्रतीक होते. खर्‍या अर्थाने ते आमचे दैवत होय. त्यांनी नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्र हितासाठी काम केले. सुवर्णयुगाच्या या शिल्पकाराने देशाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य अखेर पर्यंत केले. राष्ट्रनिष्ठा जपणारे अटलबिहारी वाजपेयी आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 

Nitin Gadkari  
माजी पंतप्रधान, भारतरत्न, परमपूज्य अजातशत्रू, आणि असंख्य भारतीयांच्या हृदयावर राज्य करणारे, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरच्या वतीने श्रद्धानंद पेठ येथील बी.आर.ए. मुंडले सभागृहात आयोजित अटल संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भाजपा नागपूर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी आमदार विकास कुंभारे, प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, मोहन मते, प्रवीण दटके, बंटी कुकडे, धर्मपाल मेश्राम, बाल्या बोरकर, श्रीकांत आगलावे, विष्णू चांगदे आदी उपस्थित होते.
 
 

पक्षकार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित
 
 
अटल स्मृती वर्षानिमित्त माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित अटल संवाद प्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावशाली आणि आदरणीय नेत्यांपैकी एक म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी होते. अटलजींनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत पक्षाला उभे करण्याचे काम केले आहे. आपले संपूर्ण जीवन पक्षकार्यासाठी समर्पित केले.
 
 

सर्वेक्षणाच्या आधारे तिकीट वाटप
भाजपचा एक एक कार्यकर्ता हीच आपली शक्ती असल्याचे ते विश्वासाने सांगत कार्यकर्ता हाच सर्वोपरी असल्यामुळे आज अनेक नेते मोठे झाले आहे. आजच्या घडीला मनपा निवडणूकीची उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्ते नेत्यांच्या मागे लागले आहे. मनपा निवडणूकीसाठी इच्छूकांची संख्या वाढल्याने प्रभागातील जनता हेच त्या उमेदवाराचे तिकीट ठरविणार आहे. योग्यतेनुसार तिकीट देण्यासाठी पक्षाकडून सर्वेक्षण करण्यात आले असल्याने सर्वेक्षणाच्या आधारे चांगल्या उमेदवाराला तिकीट होईल.
 
 
एकत्रित निवडणूक लढण्याची गरज
राजकीय सत्तेच्या माध्यामातून परिस्थिती बदलण्याची नितांत गरज आहे. मनपा निवडणूकीत नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. नागपूर शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी नगरसेवकांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे. एका एका प्रभागातून तिकीट मागणार्‍या इच्छूकांची संख्या वाढली आहे. यापूर्वीच्या मनपाच्या निवडणूकीपेक्षा १० अधिक जागा कशा मिळेल,यासाठी एकत्रित निवडणूक लढण्याची गरज आहे.
 
विकसित नागपूर शहर हे देशातील नंबर वनचे शहर करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांना परिश्रम घ्यावे लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0