बांग्लादेशात पुन्हा हिंदू युवकाचे मॉब लिंचिंग!

25 Dec 2025 20:18:35
नवी दिल्ली,
 
 
bangladesh-hindu-murder बांग्लादेशात हिंदूंच्या विरोधात हिंसाचाराचे सत्र अजूनही सुरूच आहे. मयमनसिंह जिल्ह्यातील भालुका येथे 27 वर्षीय दिपू चंद्र दास नावाच्या युवकाचे मॉब लिंचिंग आणि त्याचे शव जाळण्याच्या घटनेवर चर्चा सुरू असतानाच आणखी एका घटनेने बांग्लादेशातील हिंदू असुरक्षित असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गर्दीने आणखी एका हिंदू युवकाला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतला आहे. मात्र, पोलिसांनी या घटनेला नकार देत, हे प्रकरण वसुली आणि रंगदारीचे असल्याचे म्हटले आहे.
 
 
 

bangladesh-hindu-murder 
 (मृत्युमुखी पडलेला अमृत मंडल ऊर्फ सम्राट)
 
 
bangladesh-hindu-murder बांग्लादेशच्या राजबाडी जिल्ह्यातील पंशा भागात, गावकऱ्यांच्या समूहाने बुधवारी रात्री उशिरा अमृत मंडल ऊर्फ सम्राट नावाच्या 30 वर्षीय युवकाची हत्या केली आहे. पोलिसांनी मात्र, हे मॉब लिंचिंग नसून अमृतच्या विरोधात पैसे उकळण्याच्या, धमकावण्याच्या प्रकरणांमुळे झालेली हत्या असल्याचे म्हटले आहे. अमृत मंडल हा सम्राट बाहिनी नावाच्या संस्थेचा प्रमुख होता. पोलिसांनी त्याचा सहकारी मोहम्मद सलीमला एका पिस्तुलासह अटक केली आहे.
 
 
 
bangladesh-hindu-murder एका हिंदू युवकाला लोक मारहाण करीत असल्याचे वृत्त मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तिथे तो गंभीर स्थितीत जखमी अवस्थेत पडून होता. त्याला रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे पोलिसांचे मत आहे. शिवाय, सम्राटवर दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होते आणि त्याची टोळी होती आणि स्थानिक निवासी शहिदुल इसलाम नावाच्या व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी तो आला होता. इसलामच्या कुटूंबियांनी आरडाओरडा केल्यानंतर गावकरी जमा झाले. त्यांनी सम्राटला बेदम मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस सांगत आहेत. बांग्लादेशातील सध्याचे वातावरण बघता, हिंदू अल्पसंख्यकांना तिथे कोणतेही संरक्षण उरलेले नाही.
Powered By Sangraha 9.0