देऊळगाव राजा,
illegal sand mining आज दिनांक 24 12 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी किरणजी पाटील ,उपविभागीय अधिकारी संजयजी खडसे, देऊळगाव राजा तहसीलदार माननीय वैशाली डोंगरजाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाने मौजे मेहुणा राजा येथील खडकपूर्णा धरण विश्रामगृहाजवळील जलाशयाच्या काठी सकाळी सहा वाजता अवैध रेती उत्खनन करणाऱ्या दोन मोठ्या फायबर बोटी व दोन इंजिन बोटी अशा एकूण चार बोटी पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आल्या त्यानंतर सदर बोटी व त्यावर काम करणारे तीन परप्रांतीय मजूर यांना पोलीस विभागाने ताब्यात घेतले.
तसेच त्यानंतर सदर बोटी सीनगाव जहागीर येथील जलाशयाकाठी सुरक्षित पणे नष्ट करण्यासाठी आणण्यात आल्या .त्यानंतर सदर बोटी महसूल विभाग तथा पोलीस विभाग मधील अधिकारी तथा कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत नष्ट करण्यात आल्या सदर कार्यावाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय मनीषा कदम मॅडम, महसूल नायब तहसीलदार माननीय सायली जाधव मॅडम, पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद गिरी साहेब, महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे मॅडम, मंडळ अधिकारी विजय हिरवे ग्राम महसूल अधिकारी सुरेश डोईफोडे ,परमेश्वर बुरकुल ,सुषमा रगडे ,पोलीस अंमलदार प्रमोद मुळे, रामकिसन गीते,अशोक सांगळे, विजय दराडे, प्रवीण डोईफोडे , संतोष चेके, गजानन ठाकरे आणि सोळंकी, महसूल सेवक कविता शिरसाठ, खडकपूर्णा प्रकल्प उपविभाग चे सुरक्षा कर्मचारी पुरुषोत्तम भागीले व इतर प्रत्यक्ष उपस्थित होते.illegal sand mining मोक्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही सर्व कार्यवाही शांततेत पार पडली