विनापरवाना अवैध मासेमारी करणार्‍यांवर गुन्हा दाखल

25 Dec 2025 09:17:23
वर्धा,
illegal fishing निम्न वर्धा प्रकल्प क्षेत्रात बेकायदेशिरित्या सुरू असलेल्या मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुत स्वप्नील वालदे यांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलिस स्टेशनच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८० किलो तिलमिया व पडन जातीचे मासे व साहित्य जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

मासेमारी  
 
 
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. दादाराव केचे यांनी निम्न वर्धा प्रकल्पात अवैध मासेमारी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दखल घेऊन मत्स्य विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मत्स्य विभागाने २३ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास निम्न वर्धा प्रकल्पातील धनोडी येथील पिपरी पारगोठाण आणि हैबतपूर परिसरात केलेल्या कारवाईत अंदाजे ३ हजार २०० रुपयाचे वजन काटे व मापे, मासेमारीची साधने तसेच होंडा दुचाकी, अंदाजे ८० तिलपिया व पडन जातीचे चोरीचे मासे जप्त केले. जप्त करण्यात आलेले मासे नष्ट करण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून काही व्यती पळून जाण्यात यशस्वी झाले तर चौकशीअंती पिंटू उर्फ निलेश लसनकर आर्वी, धनराज भोवरे पिपरी पारगोठाण आणि जी. येकन्ना बाबू उर्फ जोसेफ आंध्रप्रदेश यांच्याविरुद्ध मासेमारी चोरीचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया आर्वी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.illegal fishing ही कारवाई मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुत स्वप्नील वालदे, लिपिक धोंडीबा जाधव, चालक लकी अफसर अली, आर्वीचे उपनिरिक्षक राज पंडित व त्यांच्या संयुत पथकाने केली. शासकीय जलाशयांमध्ये होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभाग सतर्क असून यापुढेही अशी धडक मोहीम सुरूच राहील. विनापरवाना मासेमारी करणार्‍यांवर कठोर कायदेशिर कारवाई केली जाईल, असे स्वप्नील वालदे यांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0