मध्य रेल्वेतर्फे सौरऊर्जेद्वारे सुरक्षित लेव्हल क्रॉसिंग

25 Dec 2025 21:41:58
नागपूर,
central-railway : प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासह पर्यावरणपूरक व शाश्वत चालना देण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे सौरऊर्जेद्वारे सुरक्षित लेव्हल क्रॉसिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. यात लेव्हल क्रॉसिंग वीजपुरवठा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी ऑल-इन-वन सोलर स्ट्रीट लाइट व ऑफ-ग्रिड सोलर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
 
 
lk
 
या उपक्रमांतर्गत चार एलसी गेटवर होम लाइट प्रणालीसह ऑल-इन-वन सोलर स्ट्रीट लाइट्स आले आहेत. या आधुनिक सोलर लाइट्समध्ये मोशन सेन्सर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गरजेनुसार प्रकाशाची तीव्रता आपोआप समायोजित होते. त्यामुळे ऊर्जा होण्यासह एलसी गेट परिसरात योग्य व पुरेशी प्रकाशव्यवस्था सुनिश्चित होते. या सोलर लाइट्सचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे सलग दोन दिवस सूर्यप्रकाश उपलब्ध नसला, तरीही या लाइट्स कार्यरत राहतील. याशिवाय प्रत्येक एलसी गेट केबिनच्या छतावर ७५ वॅट क्षमतेच्या बॅटरीसह ऑफ-ग्रिड सोलर प्रणाली बसविण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे चार लाइट्स, एक बसविलेला पंखा तसेच एक प्लग पॉइंट यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे गेटमनसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यात मदत होईल.
Powered By Sangraha 9.0