मुख्याधिकाऱ्याच्या मनमानी विरोधात शहर बंदचे आयोजन उद्या

25 Dec 2025 19:57:22
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
babhulgaon-struggle-committee : बाभुळगाव संघर्ष समितीच्या सदस्यांवर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. पीएस सोटे यांनी दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यासोबतच विविध मागण्यांसाठी शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी बाभुळगाव शहर बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
band
 
 
 
येथील मुख्याधिकाèयांच्या मनमानी कारभाराविरोधात बाभुळगाव संघर्ष समिती आक्रमक असून या संबंधीचे निवेदन तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. नगर पंचायतच्या सभागृहात 23 डिसेंबर रोजी मुख्याधिकारी डॉ. पीएस सोटे यांनी वाढीव कर आकारणी आक्षेपाबाबत सुनावणी ठेवून शहरातील मालमत्ताधारकांना नोटिसी बजावल्या होत्या.
 
 
त्यानुसार सकाळी 11 पासून शहरातील मालमत्ताधारक, त्यांचे प्रतिनिधी नगर पंचायत सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु मुख्याधिकाèयांनी बाभुळगाव पोलिस ठाण्यात जाऊन बाभुळगाव संघर्ष समितीचे सदस्य नगरसेवक अभय तातेड, धरमचंद छल्लाणी व इतर काही नागरिकांविरूद्ध तक्रार देवून गुन्हे दाखल केले. ही तक्रार खोटी व दिशाभूल करणारी असून जाणिवपूर्वक करण्यात आली, असा आरोप बाभुळगाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी तहसिलदार, पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
 
 
शहराच्या विकासासाठी, नागरिकांसाठी काम करत असताना विनाकारण गुन्हे दाखल करणे, शहरात मनमानी कारभार चालविणे, नगर पंचायत मधील गैरप्रकारांना मुक संमती देणे, शहरात राजकारण करणे या कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या मुख्याधिकारी विरोधात 26 डिसेंबर रोजी शहर बंदची हाक संघर्ष समितीने दिली आहे.
Powered By Sangraha 9.0