ओडिशात चकमकीत माओवानेता गणेशसह सहा ठार!

25 Dec 2025 13:56:35
कंधमाल,
four Maoists killed in Odisha  भुवनेश्वरमधील कंधमाल जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा मोठी चकमक घडली. बेलघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुम्मा जंगलात सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत दोन महिलांसह एकूण सहा माओवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये गणेश उईके या कुख्यात माओवादी नेत्याचाही समावेश आहे. गणेश उईके हा ओडिशातील माओवादी संघटनेतील एक महत्त्वाचा चेहरा होता आणि त्याच्या डोक्यावर तब्बल १.१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. चकमकीनंतर त्याचा मृतदेह घटनास्थळी सापडल्याने सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवले असल्याचे मानले जात आहे.
 

naxsal 
 
 

गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम तीव्र केली असता आणखी दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह सापडले. या दोघींची ओळख अद्याप पटलेली नाही. ओडिशा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपच्या एका मोबाइल पथकाला जंगलात माओवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला आणि त्यात माओवादी ठार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर, एक .३०३ रायफल आणि वॉकी-टॉकीसह काही साहित्य जप्त केले आहे. या चकमकीत सुरक्षा दलांच्या कोणत्याही जवानाला इजा झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, संपूर्ण परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली असून शोधमोहीम सुरूच आहे. विशेष म्हणजे, शेजारच्या मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशाचे पोलीस महासंचालक वाय. बी. खुराणा यांच्या उपस्थितीत २२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही चकमक घडली. त्यामुळे माओवादी संघटनेवर दबाव वाढत असल्याचे चित्र सध्या ओडिशामध्ये पाहायला मिळत आहे.

 
Powered By Sangraha 9.0