वॉशिंग्टन,
Gaming zone at the wedding reception ब्रिटन आणि अमेरिकेत लग्नाचा अनुभव आता बदलत आहे. पारंपारिक रिसेप्शनमध्ये डीजेच्या तालावर नाचणे आणि नृत्य फ्लोअरवर वेळ घालवणे ही पद्धत आता नवीन ट्रेंडमध्ये मागे पडत आहे. तरुण जोडपे त्यांच्या रिसेप्शनला अधिक मजेदार बनविण्यासाठी नृत्याऐवजी गेमिंग झोनची निवड करत आहेत.
या गेमिंग झोनमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम्स, मारियो कार्ट, सुपर स्मॅश ब्रदर्स आणि रेट्रो गेम्सचा समावेश केला जातो. हे गेम्स फक्त मनोरंजनच नाहीत, तर अनोळखी लोकांमध्ये ओळख वाढविण्याचा एक प्रभावी मार्ग बनतो आहे. युनायटेड किंगडममध्ये हा ट्रेंड २०१६ मध्ये विल्टशायर येथील लग्नातून सुरू झाला. सुरुवातीला फक्त आठ लग्नांमध्ये गेमिंग सेटअप वापरला गेला होता, मात्र मागणी दरवर्षी वेगाने वाढत आहे. लंडनमधील लग्न नियोजक जॉय पॅड यांनी सांगितले की मागील वर्षी ३०० हून अधिक जोडप्यांनी त्यांच्या रिसेप्शनसाठी गेमिंग कॉर्नर बुक केले. ही मागणी दरवर्षी अंदाजे ३५ टक्क्यांनी वाढत आहे.
अमेरिकेतही हा ट्रेंड वेगाने पसरत आहे. लॉस एंजेलिसमधील लग्न डिझायनर म्हणतात की, तरुण जोडप्यांनात्यांच्या वैयक्तिक कथा आणि आवडी प्रतिबिंबित करणारे काहीतरी करायचे आहे. असे गेमिंग सेटअप जोडप्यांना रिसेप्शन अधिक संस्मरणीय बनवण्यास मदत करतो. या नवीन ट्रेंडमुळे लग्न उद्योगातही नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. गेमिंग सेटअपसाठीची मागणी वाढत आहे आणि हा व्यवसाय सतत विस्तारत आहे. या ट्रेंडमुळे लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक अनोखा अनुभव तयार होतो.