“ये शहर अपना है'… बीएमसी भी अपना ही होगा!

25 Dec 2025 11:45:48
मुंबई,
Govinda  महाराष्ट्रातील राजकारणात बीएमसीसह महानगरपालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आगामी बीएमसी निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मात्र, पक्षाकडून अद्याप उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
 

Govinda  
 
 
शिवसेनेने जाहीर केल्या ४० स्टार प्रचारक
  
पुढील महिन्यात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकांसाठी शिवसेनेने प्रचारयंत्रणा सक्रिय केली आहे. भाजपसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. २०२२ मध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.
जाहीर करण्यात आलेल्या यादीत राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा, माजी खासदार संजय निरुपम आणि अभिनेता गोविंदा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरून शिवसेनेसाठी प्रचार करताना दिसणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र, खासदार व शिवसेना संसदीय पक्षाचे नेते श्रीकांत शिंदे हे देखील स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.
 
 
 
या यादीत शिवसेनेचे ज्येष्ठ Govinda  नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, नीलम गोऱ्हे आणि मीना कुंबळे यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, उपमुख्यमंत्री शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, राज्यमंत्री योगेश कदम हेही प्रचारात सक्रिय राहणार आहेत. धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, अल्पसंख्याक मंत्री समीर काझी आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनाही प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजप यांच्यात महानगरपालिकांमधील १५० हून अधिक जागांवर एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांबाबत चर्चा सुरू आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका शिवसेनेसाठी निर्णायक ठरणार आहेत. २०२२ पूर्वी शिवसेनेने ५३ नगरपरिषद अध्यक्षपदे जिंकली होती. त्यामुळे या निवडणुकांतून पक्षाची ताकद पुन्हा सिद्ध करण्याचे आव्हान शिंदे गटासमोर आहे.स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असली तरी उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडी आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0