हादी हत्या युनूसच्या षड्यंत्राचा भाग!

25 Dec 2025 10:27:13
ढाका,
Hadi assassination conspiracy of Yunus बांगलादेश छात्र लीगचे सरचिटणीस शेख एनान यांनी उस्मान हादी यांच्या हत्येमध्ये अवामी लीगचा सहभाग असल्याचे आरोप फेटाळून लावले असून, ही घटना मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हादीच्या हत्येनंतर घडलेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करत अंतरिम सरकारवर इस्लामिक दहशतवादी आणि अतिरेक्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला. बांगलादेश छात्र लीग ही शेख हसीनांच्या पक्षाची, अवामी लीगची विद्यार्थी संघटना आहे.
 
 

conspiracy of Yunus 
शेख एनान यांनी एएनआयशी दिलेल्या मुलाखतीत सांगितले, बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत दुःखद आहे. ऑगस्ट २०२४ नंतर सत्तेत राहण्यासाठी युनूस सरकार इस्लामिक दहशतवादी आणि अतिरेक्यांना संरक्षण देत आहे. हे षड्यंत्र शेख हसीनांविरुद्ध जाणूनबुजून रचले गेले आहे, भारताच्या मदतीने हसीनाचे प्राण वाचले. आता युनूस देशाची आर्थिक रचना आणि सामाजिक सौहार्द नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
एनान यांनी हादीच्या हत्येची जबाबदारी युनूस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवामी लीगविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी केली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "५ ऑगस्ट २०२४ पासून अवामी लीग समर्थकांवर अत्याचार होतो असून, त्यांना शिक्षणासारख्या मूलभूत अधिकारांपासून वंचित केले जात आहे. अशा परिस्थितीत हादीचे मारेकरी अवामी लीगचे असणे शक्य नाही; हा पूर्णपणे बनावट आणि खोटा आरोप आहे. हादीची हत्या आणि त्यानंतरच्या हिंसाचारामुळे देशभरात निदर्शने आणि दंगली झाली. यात धार्मिक अल्पसंख्याक आणि पत्रकारांवर हल्ले झाले. काही वृत्तांतांनी हादीला भारतविरोधी ठरवून, त्यांच्या मृत्यूला निवडणुका प्रभावित करण्यासाठी केलेले षडयंत्र म्हणून वर्णन केले आहे. दरम्यान, बुधवारी (२४ डिसेंबर) संध्याकाळी ७:३० वाजता ढाक्यातील उड्डाणपुलावरून क्रूड बॉम्ब फेकल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना मुक्तिजोधा सेंट्रल कमांड कौन्सिलच्या गेटसमोर घडली, जी एजी चर्च आणि एजी चर्च स्कूलजवळ आहे. पोलिस तपास करत आहेत, परंतु अद्याप कोणी जबाबदारी स्वीकारलेली नाही. ही घटना चालू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर घडली आहे.
Powered By Sangraha 9.0