तभा वृत्तसेवा
कळंब,
hand-pump-irregularities-exposed : तालुक्यातील सोनेगाव येथे मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतिकडून 80 फूट खोल हात पंप खोदला गेला होता. मात्र त्याच हात पंपाचे 200 फूट खोलीचे बिल काढल्याचे धक्कादायक प्रकरण सोनेगाव येथील कैलास वडतकर यांनी तक्रारीद्वारे उघडकीस आणले आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतच्या कामात सावळा गोंधळ आहे. त्यातच लोकोपयोगी कामे करताना मलीदा लाटण्यासाठी अनेक कर्मचाèयांनी आपली बुद्धीचा वापर केला आहे. असेच प्रकरण सोनेगाव येथे घडले. येथील हातपंप 80 फूट खोदून त्याचे बिल चक्क 200 फुटांचे काढण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी सांगड घालून या कामाला पूर्णतःवास नेल्याची चर्चा आहे.
या प्रकरणाची सोनेगावातील कैलास वडतकर यांनी लेखी तक्रार करून हा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकशीच्या नावाखाली तक्रारदाराची दिशाभूल
या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी सोनेगाव गावात पोहोचले. त्यात तक्रारदाराला आम्ही औपचारिक तपासणी करिता आलो आहे. मुख्य तपासणी नंतर होईल. असे सांगून संबंधित कर्मचाèयांनी लेखी अहवालावर तक्रारदाराच्या सह्या घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र काही सुज्ञ नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने तक्रार दाराच्या फसवणूकीचा हा प्रयत्न फसला. त्यामुळे चौकशी करण्याकरिता गेलेले ते कर्मचारी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच भ्रष्टाचाराचे प्रकरण दडपण्यासाठी सहकार्य करणाèया त्या दोन कर्मचाèयांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी सोनेवासीयांनी केली आहे.