माधुरी मडावींमुळे काँग्रेसचे नुकसानच..!

25 Dec 2025 12:31:58
अनिरुद्ध पांडे
यवतमाळ,
madhuri madavis भाजपावाल्यांना धडा शिकवण्यासाठी कदाचित कामी पडतील म्हणून का होईना, यवतमाळकर काँग्रेसवाल्यांनी नगर परिषदेच्या माजी मुख्याधिकारी व प्रशासक माधुरी मडावी यांना जवळ केले. पण आता निवडणुकीनंतर त्यांचा पक्षाला काही फायदा होणे तर दूरच, पण नुकसानाच झाल्याचे आता काँग्रेसचे निष्ठावान बोलून दाखवीत आहेत.
 
 
माधवी मडावी
 
 
माधुरी मडावी यांची यवतमाळ नपतील कारकीर्द नक्कीच ‘डायनॅमिक’ होती. बèयाच वर्षांत येथील जनतेने कार्यक्षम मुख्याधिकारी अनुभवला नव्हता. मडावींची कार्यशैली ‘अतिकार्यक्षम’ या दिशेने भरकटणारी असली तरी ती सर्वसामान्यांना आकर्षून घेणारी होती.
या साèयांतून मिळालेली लोकप्रियता ‘कॅश’ करून घेण्याचे वेध मुळात राजकारणाचा पिंड असलेल्या मडावींना लागले होते. पण अशी लोकप्रियता मिळाली की काही मुंगळे येऊन चिपकणार आणि काही दुरावणार असे होतेच. त्यांच्याजवळ घुटमळणारे काहीजण तरी आपली पोळी शेकून घेणारेच होते.
यवतमाळ शहराशी तसे काही जुने देणेघेणे नसताना माधुरी मडावी येथील जनतेच्या ‘रिस्पॉन्स’ आणि खूशमस्कèयांमुळे सुखावून गेल्या होत्या. त्यांच्या राजकीय इच्छा प्रज्वलित झाल्या. येथून बदली झाल्यानंतरसुद्धा काही ना काही निमित्ताने त्यांनी यवतमाळात संपर्क सुरूच ठेवला. त्यांच्या चाहत्यांचा गट त्यांच्या राजकीय हेतूंना खतपाणी घालतच राहिला.
‘नगरां’च्या निवडणुका घोषित झाल्या आणि माधुरी व त्यांचे हस्तक कामाला लागले. अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निघाल्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षा एकदमच उफाळून आल्या. काँग्रेसचे संबंध होते ते अधिक मजबूत झाले. काँग्रेसजवळही दुसरे नाव नसल्यामुळे त्यांची मडावींच्या रूपाने सोयच झाली होती.
अधिकृत उमेदवार माधुरी मडावींची काही अडचण झाल्यास ‘पर्याय’ म्हणून ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांच्या सूनबाई प्रियंका जितेंद्र मोघे यांना नामांकन दाखल करण्यास काँग्रेसने तयार केले. पण नामांकनानंतर काँग्रेसचे वांधेच वांधे होऊ लागले. मडावींचे नामांकन रद्द झाले. या अनपेक्षित अडचणींमुळे मडावींनी खूपच धावाधाव केली.madhuri madavis पण त्यांचे मुद्दे निरर्थकच होते. या साèया धावपळीत प्रियंका मोघे यांचे स्थान काय, त्यांनी प्रचाराला सुरुवात करायची की नाही, हा प्रश्न त्यांच्या मोघे गटासह निष्ठावान काँग्रेसींनाही पडू लागला. पक्षाशी कवडीचाही संबंध नसलेल्या माधुरी यांचे ‘जमून’ आले तर वर्षांनुवर्षे निष्ठावान मोघे कुटुंबातील प्रियंका यांनी माघार घेऊन गुपचूप घरी बसायचे का, हाही विषय चर्चेला आला. शेवटी काँग्रेसचे नुकसान झाले ते झालेच, या साèयांत..!
Powered By Sangraha 9.0