कारंजा लाड,
harish heda accident नागपूर- संभाजीनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कारंजा शहर अध्यक्ष हरीश हेडा जागीच ठार झाले. ही घटना २४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, हरीश हेडा हे मोटरसायकलने कारंजाकडे येत असताना समोरून येणार्या एमएच ३० बिडी ७४९० मालवाहू वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला नागपूर - संभाजीनगर महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ जोरदार धडक दिली.

या घटनेत ते जागीच ठार झाले. दरम्यान, अपघात झाल्याची माहिती शिवनेरी रुग्णवाहिकेचे संचालक अनुप ठाकरे यांनी कळवताच शिवनेरी रुग्णवाहिकेचे विनोद खोंड वेगाने घटनास्थळी पोहचले व त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालय दाखल केले असता कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. हरीश हेडा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मागील सुमारे दहा वर्षापासून सक्रिय आहेत.harish heda accident नुकत्याच पार पडलेल्या कारंजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी अलका हेडा ह्या अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तथा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.