नागपूर,
bjp-veer-bal-din : शिखांचे दहावे गुरू, गुरु गोबिंद सिंह जी यांच्या चार साहिबजाद्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे नागपुरात ’वीर बाल दिन’ निमित्त विशेष कीर्तन आयोजन करण्यात आले आहे.
भारत सरकारने २०२२ पासून २६ डिसेंबर हा दिवस ’वीर बाल दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली असून, गुरु गोबिंद सिंह यांच्या साहिबजाद्यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी मुघलांविरुद्ध लढा देताना दिलेल्या प्राणांच्या आहुतीचे स्मरण या दिवशी केले जाते. या महान बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष तिवारी यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता कलगीधर दरबार बुद्ध नगर येथील ’गुरुद्वारा’ येथे या भव्य कीर्तन दरबारचे नियोजन करण्यात आले आहे.
भाजप तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, हनी भंडारी, प्रिन्स सिंग खट्टर, मोहिंदरपाल सिंग लांबा, गुरड्याल सिंग, कुलविंदर सिंग सबरवाल, सिंग बहल, हरविंदरसिंग खंडिया कार्यरत आहे.