हनीट्रॅपमधील महिला पत्रकाराला अटक

25 Dec 2025 21:46:26
अनिल कांबळे
नागपूर, 
honeytrap-female-journalist : मेयाे रुग्णालयातील एका डाॅक्टरला हनीट्रॅपमध्ये फसवून दाेन काेटींची खंडणी मागणाऱ्या टाेळीचा तहसील पाेलिसांनी छडा लावला आहे. पाेलिसांनी या टाेळीतील आणखी एका महिला आराेपीला अटक केली आहे. ती तरुणी स्वतःला पत्रकार असल्याची सांगत असून या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. किरण मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
 
 
 
jlk
 
 
 
पाेलिसांनी यापूर्वी अश्विन विनाेद धनविजय (39, चंद्रमणीनगर, जयभीम काे-ऑपरेटिव्ह साेसायटी, अजनी), नितीन सुखदेव कांबळे (38, चंद्रमणीनगर, महाथेरा चंद्रमणी बाैद्ध विहाराजवळ, अजनी), कुणाल प्रकाश पुरी (42, चंद्रनगर, जुन्या काॅर्पाेरेशन शाळेजवळ, अजनी), रविकांत कांबळे (38, दिघाेरी) रितेश उफर् पप्पू मनाेहर दुरुगकर (41, मनीषनगर, बेलतराेडी), आशिष मधुकर कातडे (36, गाेंदिया), आशिष हेमराज साखरे (35, गाेंदिया) यांना पाेलिसांनी सुरुवातीला अटक केली हाेती. या आराेपींनी हनीट्रॅप करुन मेयाेचे डाॅक्टर यांना अडकवून दाेन काेटींची खंडणी मागितली हाेती.
 
 
ही टाेली महिलांच्या माध्यमातून ते सावज हेरायचे आणि संबंधित व्यक्तीला एकट्यात बाेलवायचे. तेथे महिलांसाेबत शारीरिक संबंधाचे माेबाईलने चित्रीकरण करून ते सार्वजनिक करण्याची धमकी द्यायचे. त्यांनी मेयाेच्या एका डाॅक्टरला जाळ्यात ओढले. तीन महिलांशी अश्लील चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत आराेपींनी त्यांना दाेन काेटींची खंडणी मागितली हाेती. पाेलिसांनी आरुषी नावाच्या महिलेलाही अटक केली हाेती. चाैकशीच्या दरम्यान महिला पत्रकार किरण मेश्रामचे नाव समाेर आले. ती फरार हाेती. मात्र, तिला बुधवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण 13 आराेपींची नावे आहेत. या टाेळीचा राज्यभर हैदाेस असून मुंबई-पुणे येथील व्यापाèयांना या टाेळीने जाळ्यात अडकवल्याची माहिती समाेर येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0