नागपूर,
p-sainath : कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स) हे एक साधन असले तरी त्याचा वापर कसाही नको, तो योग्यरितीनेच व्हावा, असे आग्रही प्रतिपादन जगविख्यात पत्रकार पी. साईनाथ यांनी आज येथे केले. विदर्भ सांस्कृतिक परिषद, विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमालेत पी. साईनाथ बोलत होते. ‘भाषा, साहित्य, संस्कृती व माध्यमेः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात’ हा त्यांचा विषय होता. ‘आर्टिफिशिअल इंटिलिजन्स फ्रॉम आर्टिफिशिअल इन्फॉर्मेशन’ अशी आजची अवस्था झाली असल्याचे त्यांना नमूद केले.
ते म्हणाले की, कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर जरूर करा. पण, क्रियेटिव्ह कामांसाठी अजिबात करू नका. प्रत्येक भाषा ही आपली भाषा, आपली मातृभाषा आहे, हे समजून घ्यावी लागेल. एआयच्या मालकाने त्यात अॅल्गोरिदमचा वापर केला आहे. एआयच्या वापरामुळे भाषेची श्रीमंती, विचारांची समृद्धी संपून जाईल.
दखनी, वèहाडी, भोजपुरी, मराठी वगैरे सर्व मूळ भाषा मृतप्राय होतील. मूळ भारतीय संस्कृतीला हे मारक ठरेल. संत ज्ञानेश्वर- तुकारामांनी भाषेचा वापर लाभ (प्रॉफिट) मिळवण्यासाठी केला नाही, हे एआयचा वापर करण्यापूर्वी लक्षात घ्यायला हवे. डिजिटल हा एआयचाच प्रकार, स्वीडनने शाळेत पुस्तके जूर सारून डिजिटलचा वापर सुरू केला होता. मात्र, आता ते बंद करून पुन्हा पुस्तके मुलांच्या हाती दिली आहेत.
विधि शिक्षणात एआयचा वापर होतोय. भविष्यात ही मुले वकिली कशी करणार, हा प्रश्नच आहेे. माध्यमांमध्ये एच 1 व्हिसा याचीच जास्त चर्चा होतेय. पण, विदर्भात शेतकèयांच्या आत्महत्येची चर्चा होत नाही. मास मीडिया व मास रिअॅलिटी प्रत्यक्षात विरुद्ध दिशेने जात आहेत. एआय वापरूच नका, असे म्हणणे नाही. संस्कृती व साहित्यात एआयचा वापर नकोच. क्रियेटिव्हमध्ये नकोच नको.
व्याख्यानाच्या पहिल्या टप्प्यात पी. साईनाथ यांनी विविध क्षेत्रात असमानता असल्याचे विविध उदाहरणे देऊन सांगितले. डॉ. श्रीपाद जोशी यांनी पी. साईनाथ यांचा सत्कार केला. शेतकरी नेते विजय जावंधिया, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, नुटाचे डॉ. अनिल ढगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.