खळबळ! एका कुटुंबातील 'चार जणांचा मृत्यू'

25 Dec 2025 12:27:12
नांदेड,
Nanded family deaths मुदखेड तालुक्यातील जाला मुरार गावात एका एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतप्ती आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतकांमध्ये दोन मुले आणि त्यांच्या पालकांचा समावेश आहे.
 
 

Nanded family deaths 
घटनेनुसार, बजरंग रमेश लाखे (वय २२) आणि उमेश रमेश लाखे (वय २५) या दोन भावांनी मुदखेड रेल्वे स्टेशनजवळ रेल्व्याखाली उडी घेतली आणि आपले प्राण गमावले. त्यांच्या पालकांना, रमेश होनाजी लाखे (वय ५१) आणि राधाबाई रमेश लाखे (वय ४४), त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळले. या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण केली आहे आणि अनेकांनी या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.माहितीप्रमाणे, मोठा मुलगा उमेश लाखे पूर्वी MNS चा तालुका उपाध्यक्ष होता आणि सामाजिक कार्यातही सक्रिय होता. त्यामुळे या घटनेने स्थानिक समाजात मोठा धक्का बसला आहे.
 
 
घटनास्थळी पोलिसांची Nanded family deaths मोठी फौज दाखल झाली असून, चौकशी सुरु आहे. पोलिस तपास करत आहेत की, या कुटुंबीयांनी आत्महत्या केली आहे की अन्य काही अपघातामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, घटनास्थळी कोणताही सुसाइड नोट आढळला आहे का, याचीही तपासणी केली जात आहे.पोस्टमार्टमसाठी सर्व मृतदेह पाठवण्यात आले असून, पोलिसांनी परिसरातील नागरिकांना शांती राखण्याचे आवाहन केले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या सुरुवातीच्या माहितीनुसार, पारिवारिक वाद, सामाजिक दडपण किंवा इतर कारणांमुळे असा निर्णय घेण्यात आला असावा, असे प्रथम अनुमान व्यक्त केले जात आहे, पण अधिक तपासानंतरच खरी कारणे समोर येतील.जाला मुरार गावातील ही धक्कादायक घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0