नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोरेवाड्यात सफारी हाऊसफुल्ल

25 Dec 2025 21:37:21
नामदेव भदे
नागपूर,
gorewada-safari-housefull : नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक महाविद्यालयाला सुटी असल्याने महाराजबाग, गोरेवाडा प्राणीसंग्रहालय, ताडोबा जंगल सफारी व इतर ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. शासकीय कर्मचार्‍यांना शनिवार, रविवारची सुटी असल्याने जंगल सफारीसोबतच प्राणी संग्रहालयातही पर्यटकांची संख्या वाढली आहे. नाताळ सणानिमित्त दिवसभरात जवळपास अडीच हजार पर्यटकांनी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात भेट दिली. यानंतर सुध्दा पर्यटकांचा ओघ पुढील १५ दिवसपर्यंत राहणार असल्याची माहिती गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे संचालक पांडुरंग पाखले यांनी दिली आहे.
 

gorewada 
सफारीसाठी ऑनलाइन, ऑफलाइन बुकिंग
 
मुख्यत: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी सुटी घेतल्यानंतर पर्यटनस्थळी वर्दळ वाढली आहे. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा देण्यात येत आहे. सफारी व्यतिरिक्त प्राणीसंग्रहालयात फूड कोर्ट, लहान मुलांसह पालकांसाठी टॉय ट्रेन आणि अनेक फूड स्पॉट्ससह सुविधा उपलब्ध आहेत. प्राणीसंग्रहालय सफारीसाठी पर्यटक ऑनलाइन तसेच ऑफलाइन बुकिंग करू शकतात.
 
दररोज १,५०० च्या जवळपास पर्यटक येतात
 
 
गुरुवारी गोरेवाडा प्राणीसंग्रहालय सफारी बसेस दिवसभर हाउसफुल्ल धावत होत्या. सकाळपासून तर सायंकळपर्यंत दररोज १,५०० च्या जवळपास पर्यटक येतात. मात्र नाताळाची सुटी असल्याने दिवसभरात एकूण २५००हून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहालय सफारीचा आनंद लुटला. फॅमिली टूर म्हणून गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात दिवस घालविला. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी आता सहकुटुंब सहलींचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर आणि त्यानंतर सुध्दा गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील सफारी करिता हाऊसफुल्ल गर्दी राहणार आहे.
 
एसी बसचे भाडे ४०० रुपये
 
 
प्राणीसंग्रहालयाला भेट देण्याची योजना आखली होती. सुटीच्या पार्श्वभूमीवर गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात एसी बसचे भाडे ४०० असून तास दीड तासात सफारी व्यतिरिक्त प्राणीसंग्रहालयात मनमुराद फेरफटका मारता येते. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी नियोजन केल्या जात आहे.
 
 
विविध कामाचे टेंडर
 
 
आफ्रिकन सफारी सुरु झाल्यानतर पर्यटकांना वाघ आणि बिबटे तसेच सिंह, पाणघोडे, गेंडे आणि इतर आफ्रिकन वन्यजीव पाहता येणार आहे. याशिवाय १८ ते २० फूट उंचीचा हे एक प्रमुख आकर्षण आफ्रिकन सफारीचे राहणार आहे. विविध कामाचे टेंडर काढल्या जात आहे. त्यामुळे ही सर्व कामे पूर्ण होण्यास प्रतिक्षा करावी लागणार आहे. किमान दोन वर्षानंतर आफ्रिकन सफारीसाठी गोरेवाडा प्राणीसंग्रहालय उद्यान, गोरेवाडा बायो पार्क तयार होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0