समृद्धी महामार्गावर ट्रक चा भिषण अपघातात दोघांचा मृत्यू

25 Dec 2025 16:49:25
कारंजा लाड, 
samruddhi expressway accident समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक १९७ वर गुरुवारी २५ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. दुरुस्तीसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणार्‍या दुसर्‍या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.संतोष सिंग (वय ३५) रा.जनकपुर उत्तरप्रदेश व सुभाष वाघ (वय २५) रा.मसला जिल्हा बुलढाणा अशी मृतांची नावे आहेत. तर अनिकेत सिंग (वय ३०) रा.जनकपुर उत्तरप्रदेश हा या अपघातात गंभीर जखमी झाला.
 

samrudhi 
 
 
एमएच ०४ जेके ९४१६ क्रमांकाचा ट्रक दुरुस्तीसाठी रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून येणार्‍या एमएच १४ एच व्ही.७३९५ क्रमांकाच्या ट्रकने समोरील उभ्या ट्रकला मागून धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी शेलूबाजार १०८ समृद्धी महामार्ग येथून १०८ रुग्णवाहिका पायलट आतिश चव्हाण व डॉ. गणेश यांच्या उपस्थितीत घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहलता चव्हाण यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले, तर एका जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले.samruddhi expressway accident अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.जखमी. समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असून, दरदिवशी या मार्गावर अपघात होत आहेत.
Powered By Sangraha 9.0