संगीत कार्यक्रमाने स्नेहसंमेलनाची रंगतदार सांगता

25 Dec 2025 12:05:54
नागपूर,
Porwal Junior College - शिक्षण प्रसारक मंडळ, कामठी संचलित पोरवाल ज्युनियर कॉलेजमध्ये हिरक जयंती महोत्सवानिमित्त तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कला-गुणांचे प्रभावी सादरीकरण करत कार्यक्रमात रंगत भरली.कार्यक्रमाची सुरुवात संजीवनी खुरपडी व प्रियाशी कडू यांनी ‘हेच आमुचे प्रार्थना, हेच आमुचे मागणे’ आणि ‘एक राधा, एक मीरा’ या सुमधुर गीतांनी केली.
 
 

sd 
 
 
 
पहिल्या दिवशी मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वन मिनिट गेम्स तसेच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि कवी संमेलन-मुशायऱ्याने रसिकांची मने जिंकली.तिसऱ्या व शेवटच्या दिवशी भक्तीगीत व संगीत कार्यक्रमाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली. Porwal Junior College कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी मृणाल पुडके हिने केले. संगीत कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून डॉ. विनोद शेंडे, प्रा. सुषमा वासनिक आणि प्रा. ललित मासुरकर उपस्थित होते.
 
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्नील दाहात आणि युनियन बँक, रानाळा-कामठी शाखेचे व्यवस्थापक रामटेके यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल, डॉ. मनीष चक्रवर्ती, डॉ. रेणू तिवारी, पर्यवेक्षक प्रा. विश्वनाथ वंजारी, प्रा. नरेंद्र मेंढे व प्रा. वृंदेश क्षीरसागर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. आशिष क्षीरसागर यांनी मानले.
सौजन्य:डॉ. सुधीर अग्रवाल,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0