ग्रंथ पारायणाने वाणी शुद्ध : महोदय

25 Dec 2025 09:57:12
वर्धा,
mr bharat mahoday आपली संस्कृती फार मोठी आहे. अध्यात्माचा अभ्यास करायला आभाळाचा कागद आणि समुद्रातील पाण्याची शाईही कमी पडेल. आपली भाषा लवचिक आहे. ती अजून सुंदर करण्यासाठी उच्चार महत्त्वाचे असतात. ग्रंथ, संस्कृत श्लोकांनी उच्चार स्पष्ट म्हणजेच वाणीची शुद्धता आणि वाचणाने समृद्धी येते असे मार्गदर्शन भरत महोदय यांनी केले.
 

illegal sand  
 
स्थानिक भरत ज्ञान मंडळ संचालित सरस्वती विद्या मंदिर शाळा समूहाचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सोनेगाव आबाजी देवस्थान येथे आयोजित एक दिवसीय स्नेहमिलन सोहळ्यात दुसर्‍या सत्रात ते मार्गदर्शन करीत होते. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष मदन परसोडकर होते. भरत महोदय यांनी वाणीची शुद्धता उत्कृष्ट पद्धतीने मांडला तसेच वाणीचे प्रकाराविषयी माहिती देताना धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने वाणी समृद्ध होते. वाणी ही मेघावी असली पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात परसोडकर यांनी वाणीची शुद्धता करण्याकरिता सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगितले. संचालक अनिल निर्मळ यांनी प्रास्ताविक केले.mr bharat mahoday यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव संजय जलताडे, आबाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष जयंत येरावार, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष व जिपच्या माजी उपाध्यक्ष वैशाली येरावार, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0