सानिया कान्हारकरची राज्यस्तरीय निवड !

25 Dec 2025 13:36:28
नागपूर ,
Ramkrishna Wagh College महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये करिअर संसदेची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात करिअर संसदेला दिलेली सर्व कार्ये वेळेत व सातत्याने पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून पाच उत्कृष्ट राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये रामकृष्ण वाघ महाविद्यालयातील विद्यार्थिनी सानिया राजू कान्हारकर हिचा समावेश आहे. करिअर कट्टा उपक्रमाच्या माध्यमातून बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात सानिया हिला २५,००० रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.
 
 
sonali
 
 
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. मारोती वाघ, संचालिका लता वाघ, करिअर कट्टा समन्वयक प्रा. सायली लाखे पिदळी, प्रा. किरण पांडे यांनी सानिया हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.Ramkrishna Wagh College सर्व प्राध्यापकवृंदांनी तिचे भरभरून कौतुक केले. या निवडीबद्दल संस्थेचे संचालक डॉ. मारोती वाघ, संचालिका लता वाघ, कार्यकारी प्राचार्य पंकज झगडे, सर्व विभागांचे समन्वयक प्रा. दीपक ठाकरे, करिअर कट्टा समन्वयक प्रा. सायली लाखे पिदळी व प्रा. किरण पांडे यांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे आणि निवड समितीचे मनापासून आभार मानले आहेत.
सौजन्य:प्रा. सायली लाखे पिदळी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0