धावत्या डिझेल टँकरला आग

25 Dec 2025 19:35:28
ब्रम्हपुरी, 
diesel tanker catches fire : नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर धावत असलेल्या एका डिझेल टँकरला गुरूवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागून मोठा स्फोट झाला. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. ब्रम्हपुरी-नागभीड मार्गावर सायगाटा जंगल परिसर असल्याने वन्यप्राण्यांसाठी या मार्गावर अंडरपासचे काम सुरू आहे. हे काम केसीसी बांधकाम कंपनीला दिले आहे. त्या कंपनीच्या वाहनांसाठी डिझेल पुरवठा करण्यासाठी हा टँकर जात होता. दरम्यान, या टॅकरला अचानक आग लागली. अग्नीशमन वाहनाने त्वरित पोहचून आग आटोक्यात आणली.
 
 
 
tanker fire
Powered By Sangraha 9.0