गोंदिया,
gondia-news : सालेकसा तालुक्यातील कोटजंभोरा, पाऊलदौना व गिरोला येथील शेती व शेतकरी संबंधित सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालकांनी सरकारी व शेतकर्यांच्या जमिनीची अवैधरित्या नोंदणी करून शेतकर्यांच्या नावे असलेली प्रोत्साहनपर राशी 1 कोटी 13 लाख 86 हजार रूपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी तीन संस्थांच्या एकूण 28 पदाधिकारी व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
सालेकसा तालुक्यातील मानव शेतकरी बहुउद्देशीय कृषी सहकारी संस्था पाऊलदौना केंद्राचे 7 संचालक खरीप पणन हंगाम 2024 ते 2025 दरम्यान, अवैधरित्या सरकारी गटांची अकृषक नोदंणी, मूळ शेतकर्यांच्या गटांची नोदंणी दुसर्या शेतकर्यांच्या नावाने, मूळ शेतकर्यांच्या वारसादारांच्या नावाची नोंदणी अशा प्रकारच्या जमिनीच्या नोंदणीत बदल करून शेतकर्यांच्या बँक खात्यावरील प्रोत्साहनपर राशी 63 लाख 75 हजार 200 रूपयांची स्वतःच्या लाभाकरिता उचल केली. अशच प्रकारे सालेकसा सहकारी भात गिरणी संस्था सालेकसाच्या कोटजंभोराच्या 10 संचालकांनी 30 लाख 55 हजार 600 रूपयांची उचल तर कावेरी शेती साधन सामुग्री सहकारी संस्था बाम्हणीच्या गिरोला केंद्राच्या 11 संचालकांनी 19 लाख 55 हजार 200 रूपयांची उचल करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सालेकसा तहसील कार्यालयाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे निरीक्षण अधिकारी सतीश डोंगरे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी 28 पदाधिकारी व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
अशी आहेत आरोपी संचालकांची नावे...
मानव शेतकरी बहुउद्देशीय कृषी सहकारी संस्था : कैलाश अग्रवाल, विनोद अग्रवाल, रूपचंद मोहारे, रमेशकुमार अग्रवाल, लोकनाथ पटले, रमेशकुमार अंबादे, कमलादेवी अग्रवाल
सालेकसा सहकारी भात गिरणी संस्था : बाबुलाल उपराडे, मनोज इळपाते, मारोतराव उपराडे, जगन्नाथसिंह परिहार, गादीप्रसाद भगत, डिगीराम मेश्राम, सुलोचना लिल्हारे, कला खजुरिया
कावेरी शेती साधन सामुग्री सहकारी संस्था: लक्ष्मण नागपुरे, लिखीराम बालुदमाहे, सुखदास उपराडे, बोलेश्वर नागपुरे, दालचंद मोहारे, उमाप्रसाद गौतम, अमृतलाल लिल्हारे, भरतलाल नागपुरे, देवकी नागपुरे, उर्मिला दमाहे, तुरसाबाई उपराडे