अरे देवा काय बोलून गेले 'संजय राऊत' ... ज्यांचा बापच चोरीचा आहे

25 Dec 2025 13:55:54
मुंबई,
sanjay raut मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राजकीय तापमान उच्च गतीने वाढले आहे. या युतीमुळे शिंदे सेने आणि भाजपविरोधात जोरदार सामना रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फ्रंटफुटवर येत विरोधकांवर जोरदार टीका केली.
 

sanjay raut 
राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “महापालिका निवडणूक होऊ द्या, मग समोर येईल की कोणा कोणाची पोरं पळवतात. शिवसेना फोडण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिंदे सेनेचा बापच अनौरस आहे. त्यांच्या पक्षाची मुलं सांभाळावी, भाजप त्यांची मुलं पळवत आहे. कुत्रे पकडण्यासाठी गाड्या असतात, तसेच भाजपने पिंजरे लावले आहेत. महापालिकेनंतर कोणी कोणाची मुलं पळवत आहे ते समोर येईल.”
राऊतांनी शिंदे पक्षाला थेट निशाणा ठोकत म्हटले की, “शिंदेंच्या पक्षाची मुलं अनौरस आहेत, स्वतःची नाहीत. ज्याचा बापच चोरीचा आहे, तो पक्ष काय अपेक्षित आहे?” या वक्तव्याद्वारे त्यांनी शिंदे सेनेच्या नेतृत्वावर कटाक्ष साधला.
 
 
याशिवाय sanjay raut  राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “मराठी माणसासाठी आपण काय केले? बाळासाहेब ठाकरे नसतांना तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकलात का? नाही तर एका छोट्या भागाचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते. तुम्ही विदर्भ वेगळा होऊ देत नाही, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. गौतम अदानींना मुंबई विकणे हे मराठी माणसासाठी काम नाही. मोदींच्या मित्राच्या घशात फुकटात मुंबई घालणे, ही सेवा आहे का?”राऊतांनी दोन पक्ष एकत्र येण्यावर देखील टोला लगावला. त्यांनी विचारले, “दोन भाऊ एकत्र आलेत, दोन पक्ष एकत्र आलेत, सत्तेसाठी एकत्र आलेत. मग तुम्ही एकमेकांना काय चम्पी मालिश करण्यासाठी एकत्र आला आहात का?”राजकीय sanjay raut  विश्लेषकांचे मत आहे की, या पत्रकार परिषदेतील राऊतांचे वक्तव्य मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनितीत थेट भिडणारा आणि उग्र मांडणी करणारा ठरले आहे. शिवसेना–मनसे युतीमुळे विरोधकांना खऱ्या अर्थाने चांगली आव्हाने निर्माण होत आहेत आणि आगामी निवडणुकीत कोणाचा प्रभाव जास्त राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0