तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
state-award-testing-camp : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् मुंबईद्वारा स्काऊट विभागाचे राज्यस्तर राज्य पुरस्कार चाचणी शिबिर 22 ते 25 डिसेंबर या कालावधीत, श्री. संत उद्धवबाबा संस्थान मानकी (आंबा), ता. दारव्हा, जि. यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते.
या चाचणी शिबिरात पात्र ठरणाèया स्काऊटस् यांना राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्काऊट-गाईड कौशल्यावर आधारित लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा असे या चाचणी शिबिराचे स्वरूप होते.
सर्व प्रथम स्काऊट-गाईड ध्वजारोहणाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संस्थानचे देवानंद महाराज तसेच महंत स्वामीसूक्त महाराज उपस्थित होते. ते म्हणाले, स्काऊटस्चे विद्यार्थी समाजसेवक व प्रामाणिक असतात म्हणून ते देशाचे आदर्श नागरिक होईल यात शंका नाही.
शिबिरात अकोला, अमरावती, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील 148 स्काऊटस् व 27 युनिट लिडर यांनी सहभाग घेतला होता. शिबिर प्रमुख म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा संघटक (स्काऊट) गजानन गायकवाड होते. तर सहायक शिबिर प्रमुख म्हणून अकोल्याचे जिल्हा संघटक (स्काऊट) किरण लहाने होते.
यावेळी नागपूरचे जिल्हा संघटक (स्काऊट) सत्यशिल पाटील, ज्येष्ठ स्काऊटर नागोराव काकपुरे, नरेंद भांडारकर, परीक्षक गजानन गवळी, देवेंद्र ताजणे, रोव्हर लिडर देवेंद्र काळे, चेतन उरकुंडे, रामनाथ भोयर, कनिष्ठ लिपिक सूरज गोईकर, विद्यानंद कोमलवार यांची उपस्थिती होती.